Navale Bridge accident today Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात: ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री ब्रेक फेल झालेल्या भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत.

Namdeo Kumbhar

Pune Navale Bridge Accident Death Toll: पुण्यातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या नवले पुलाजवळ मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाला. हा ट्रक भूमकर पुलावर इतर ३ ते ४ वाहनाला धडकला. या थरारक अपघातात दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

कात्रज-देहूरोड बायपासवरील मुंबई-बंगळूर महामार्गावर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अपघाताची दुर्दैवी घटना घडली. साताऱ्याकडून मुंबईकडे चाललेला अवजड कंटेनर भूमकर पुलाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाले.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने या भरधाव कंटेनरने पुढे जाणाऱ्या ट्रकला आणि रस्त्यावरील इतर वाहनांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ३ ट्रक एकमेकांवर आदळले आणि वाहनांचा मोठा चक्काचूर झाला. यामध्ये कंटेनरमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. अपघातात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सत्ताधाऱ्यांना CJPच्या आंदोलनाचा धसका? मेट्रो आणि रेल्वे बंद, CJP आंदोलकांची धरपकड

फ्रान्समध्ये विद्यार्थी आंदोलनाचा भडका, ट्रम्प यांच्या विधानानं जनतेत संताप

थायलंडच्या तरूणीला 60 लाखांचा गंडा, अविवाहित असल्याचं सांगून तरूणीशी विवाह

महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम

दुष्काळामुळे राज्यात पाणी प्रश्न गंभीर, धरणांवर आता पोलिसांचा पहारा

SCROLL FOR NEXT