RTO REVEALS SHOCKING CAUSE BEHIND NAVALE BRIDGE ACCIDENT IN PUNE saam tv
मुंबई/पुणे

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पूल अपघाताबाबत आरटीओने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांमागील प्रमुख कारणे उघड झालीत. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या कंटेनर अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला होता हा अपघात कशामुळे झाला होता याची अहवाल आरटीओनं दिलाय.

Bharat Jadhav

  • नवले पुलावर झालेल्या कंटेनर अपघातात ८ जणांचा मृत्यू व १५ जखमी झाले होते.

  • आरटीओच्या अहवालानुसार वाहनाचा वेगामुळे अपघात घडला.

  • रस्ता सुरक्षा समितीनं बैठका घेऊन उपाययोजना सुचवल्या आहेत.

पुण्यातील नवले पुलावर (Navle Bridge) १३ नोव्हेंबर रोजी कंटेनरचा भीषण अपघात झाला होता. ताबा सुटलेल्या कंटेनरनं १२ ते १५ वाहनांना टक्कर दिली होती. या धडकेत कार आणि कंटेनरला आग लागली होती. नवले पुलावरील या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. नवले पुलावर होणाऱ्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवले ब्रीजवर वारंवार घडणाऱ्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनचा (National Highways Authority) दशक्रिया विधी या पुलावर विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. दरम्यान पुलावर अपघात का घडतात याबाबत रस्ता सुरक्षा समितीनं बैठक सुद्धा घेतली. आता हा अपघात कसा घडला होता, कशामुळे झाला याबाबत आरटीओनं (RTO) अहवाल दिलाय.

नवले पुलाजवळीच अपघात हा अतिवेगामुळंच झाल्याचा आरटीओचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. अपघात प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ)ने तपासणी करत अहवाल पूर्ण केलाय. हा अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालाय. याबाबतचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम RTO विभागाकडून सुरू आहे. या अहवालात अपघातग्रस्त वाहनाचा वेग जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच कंटेनर चालकानं वाहन न्युट्रल केल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आलीय. कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळेच हा अपघात झाला.

नवले पुलाजवल 13 नोव्हेंबरला एका भरधाव कंटेनरने चालक आणि वाहनांना उडवलं होतं. त्यानंतर एका कारला धडक दिल्यानंतर ती कार पुढे अडकून कंटेनर ट्रकला धडकली. यामध्ये आग लागून कार आणि कंटेनरमधील आठ जणांचा मृत्यू झाला होता.

चालकांना समुपदेशनाचे धडे

पुणे-सातारा रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आरटीओ’ विभाग सतर्क झालंय. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आरटीओ’ने रस्त्यावर दोन भरारी पथकांची नियुक्ती केलीय. यातील एक भरारी पथक वाहनांची तपासणी करेल. तसेच चालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही, याची तपासणी करेल. दुसरे पथक जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करेल.

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन भरारी पथकांची नियुक्ती केलीय. ते विविध स्तरावर काम करतील. चालकांचे समुपदेशन, तसेच वाहनांची तपासणी करणार. या कार्यवाहीमध्ये सातत्य राखले जाईल.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

आता चालकांना अपघातप्रवण भागाविषयी माहिती दिली जाणार आहे. पुढे तीव्र उतार आहे, वाहन हळू चालवा, न्यूट्रलवर वाहन चालवू नका, असे समुपदेशन केले जाणार आहे. ‘आरटीओ’चे दोन्ही पथक खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षणासाठी घरातून पळाली अन् रेड लाइट एरियात अडकली; तिथून निसटली, पण शेतात काढावी लागली अख्खी रात्र

Local Body Election: शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

Politics : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महिला नेत्याला घेतलं ताब्यात; काय आहे प्रकरण?

Wedding Mandap Importance: लग्नात घराबाहेर अंगणात मंडप का बांधतात? यामागचं शास्त्र काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT