Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident : आईच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली, वाटेतच काळाने घातला घाला; पुण्यातील अपघातात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Pune Navale Bridge Family Death News : पुण्यातील नवले पुलाजवळ ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने १० वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी आहेत. मृतांमध्ये एक संपूर्ण कुटुंब आणि ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.

Alisha Khedekar

नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने १० वाहनांना धडक दिली

या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू व १५ जण जखमी झाले

मृतांमध्ये देवदर्शनावरून परतणारे एक संपूर्ण कुटुंब आणि ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

पोलिसांचा तपास सुरू असून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

पुणे शहरात काल संध्याकाळी भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडीने पेट घेतला. या घटनेत ८ जणांचा निष्पाप बळी गेला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये एक संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. या मृत कुटुंबासोबत एक ३ वर्षीय चिमुकलीसुद्धा होती. धक्कदायक म्हणजे ही मुलगी या कुटुंबाबतील नसून मृत महिलेच्या मैत्रिणीची ही मुलगी असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जणं जखमी झाले. मृत्यूखी पडलेल्या ८ जणांमध्ये ५ पुरुष ३ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. पुण्यातील कात्रज बोगदा ओलांडल्या नंतर एका कंटेनर चा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यावरील ८ ते १० वाहनांना धडक दिली. पुढे एका कंटेनरला धडक देण्यापूर्वीच त्याच्या समोर असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ते वाहन दोन्ही कंटेनरच्या मध्यभागी सापडलं आणि अग्नितांडव झाला.

या घटनेतील मृतांमध्ये एका संपूर्ण कुटुंबचा मृत्यू झाला. हे कुटुंब गुरुवार असल्याने नारायणपूरहून देवदर्शन करून येत होते. मृत कुटुंब धायरी फाटा येथील राहणारे होते. कुटुंबामध्ये स्वाती नवलकर, त्यांची आई शांता दाभाडे आणि वडील दत्तात्रय दाभाडे हे तिघे अपघात झालेल्या कार मध्ये होते. तर यांच्यासोबतच स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणी ची तीन वर्षाची मुलगी होती. तिचा देखील या अपघातात मृत्यू झाला.

देवदर्शनाला जाणार म्हणून मृत स्वाती यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीला पिंपरी चिंचवड येथून बोलावून घेतलं होत. दरम्यान या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांनी टाहो फोडला आहे. या कारच्या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघातातील १५ जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून पुलावरील तीव्र उतारामुळे हे अपघात होत असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Aircraft Crash : मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे विमान तामिळनाडूत कोसळलं

Maharashtra Live News Update: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धडक मोर्चा

Winter Skin Care Tips For Men: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसतेय, पुरूषांनी फॉलो करा या सोप्या टिप्स

Accident News : ८ जणांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी 'तिरडी' आंदोलन, नवले पुलावर पुणेकरांचा आक्रोश!

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहऱ्यासाठी महागड्या ट्रिटमेंट घेताय? त्यापेक्षा ट्राय करा हा हॉममेड फेसपॅक, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT