Public outrage grows in Nasrapur as demands for justice intensify after shocking crime. saam tv
मुंबई/पुणे

'फाशी नाही ठेचून मारा अन् मला सांगू ही नका', नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

Nasrapur Accused Wife Reaction: पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना, आरोपीच्या पत्नीनेही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

Akshay Badve

  • नसरापूर प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट

  • आरोपीच्या पत्नीनेही कठोर शिक्षेची मागणी केली

  • अत्याचारानंतर चार वर्षांच्या मुलीची हत्या

'ज्या जागेवर चिमुकलीची हत्या झाली आहे, त्याच जागेवर नेऊन त्या नराधमाला ठेचून ठार मारलं पाहिजे, ही प्रतिक्रिया कोणत्या नागरिकांची किंवा पीडितेच्या कुटुंबियांची नाही, तर नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीची आहे. पतीच्या कृत्यामुळे आम्हाला लोकांची हाय सहन करावी लागतेय अशा नराधमाला जिवंत जाळलं पाहिजे भर चौकात जाळलं पाहिजे, असं आरोपीची पत्नी म्हणाली आहे.

पुण्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर येथे एका चार वर्षाच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीच्या पत्नीने आणि त्याच्या मुलाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरला आहे. चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्रत्येक नागरिक करत आहे.

या पार्श्वभूमीवर नसरापूरमधील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी मृत पीडितेच्या कुटुंबाची भेट घेत न्याय देणार असल्याची ग्वाही दिली. सर्व स्तरातून नसरापूर प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, तशीच तीव्र प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने दिली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून तो माझ्यासोबत राहत नाही. ज्या जागेवर त्याने हे कृत्य केलं तिथेच त्याला ठेचून मारा. नुसती फाशीची शिक्षा नको त्याला ठेचून मारलं तरच माझा अग्नी शांत होईल,असं आरोपीची पत्नी म्हणाली आहे. आरोपीला सोडवण्यासाठी आम्ही सोडवणार नाही, ना त्याच्यासाठी काही करणार. मला त्याचे तोंड देखील बघायचं नाही. त्याचे अंत्यसंस्कार केले हे सुद्धा सांगू नका, ही आपली नम्र विनंती असल्याचं त्या म्हणाल्या. आम्हाला मानसिक त्रास होतोय. तर जी चिमुरडी या घटनेत गेली तिच्यात मी माझी भाची पाहतो, त्यामुळे नराधमाला जिवंत जाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरोपीच्या मुलाने दिली आहे.

नसरापूरमधील ग्रामस्थानी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

भोर नसरापूर येथील चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य असून, त्याला लवकरात लवकर फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थानी आज आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार या घटनेला जबाबदार असलेला आरोपीला फासावर चढवण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली

एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनं प्रवाशांची घाबरगुंडी उडाली; जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या अन् दुसऱ्या ट्रेनखाली आले

Nagpur Tourism : नागपूरजवळील रमणीय पर्यटनस्थळ, रिमझिम पावसात बहरते 'या' ठिकाणाचे सौंदर्य

पंढरपुरात अपघाताचा थरार; १४ भाविकांवर काळाचा घाला, भीषण दुर्घटनेने महाराष्ट्रावर शोककळा

Solapur Accident: नाशिकच्या अपघाताची पुनरावृत्ती! माळशिरसमधील थरकाप उडवणारा अपघात घडला कसा?

SCROLL FOR NEXT