Nasrapur Case Verdict Saam Tv
मुंबई/पुणे

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

Pune Court On Nasrapur Case: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर न्यायालयाने अंतिम सुनावणीदरम्यान मोठा निर्णय घेतला. आरोपी भिमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

Priya More
  • नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय

  • आरोपी भिमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली

  • आरोपीला फाशीची शिक्षाही अपुरीच असल्याचे न्यायालयाचे म्हणणे

पुण्यातील नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणात अखेर पुण्यातील विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला न्यायालयाने आधीच दोषी ठरवलं होतं. आज या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या सुनावणीदरम्यान नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीचे आई -वडील आजी इतर नातेवाईक कोर्टात हजर होते. वडिलांनी कोर्टाकडे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सांगितले की, 'हा गुन्हा मृत्यूदंड देण्यास पात्र ठरतो. आरोपीला फाशीची शिक्षाही अपुरीच आहे. आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा देखील अपुरीच असेल. कृत्य आरोपीने केल्याचे सिद्ध झालं आहे. त्याला केलेल्या कृत्याचा काहीच पश्चाताप नाही. हा आरोपी समाजात राहणं धोकादायक आहे. हत्येनंतरही आरोपीने लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले. आरोपीने चिमुकल्या मुलीला जीवंत राहण्याचा कोणताच पर्याय ठेवला नाही. आरोपीला दया दाखवण्याचे एकही कारण नाही. आरोपीचं समाजात वागणं अत्यंत वाईट आहे.'

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने गुरूवारी भिमराव कांबळेला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांअंतर्गत दोषी ठरवलं होतं. त्यानंतर न्यायालयात आरोपीला काय शिक्षा द्यायची या मुद्द्यावर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांच्या वतीने स्वतंत्रपणे युक्तिवाद करण्यात आला. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आरोपीमुध्ये सुधारण्याची शक्यता नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी ही घटना घडली होती. ३ वर्षांच्या चिमुकलीवर भिमराव कांबळे या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. चिमुकलीला वासरू दाखवतो सांगत आरोपी तिला गोठ्यात घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्याने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. चिमुकली आजोळी आजीकडे गेली असता ही घटना घडली होती. आरोपीला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली होती. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुण्यात रास्तारोको करत पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला होता. संपूर्ण राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT