Pune Nashik Highway Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Pune-Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहनाने १७ महिलांना उडवलं, हृदयद्रावक घटना

पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे.

रोहिदास गाडगे

Pune Nashik Highway Accident : पुण्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ महिला जखमी झाल्या आहेत. (Pune Nashik Highway)

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिस (Police) त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. (Latest Marathi News)

दरम्यान, पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून अजूनही १२ महिलांवर उपचार सुरू असून यापैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मध्यारात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा ओरडा झाला. रस्त्यावर रक्ताची थारोळी साचली. अपघातग्रस्त महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने १७ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT