Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडणार तोच... VIDEO व्हायरल

या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Samrudhi Mahamarg Accident
Samrudhi Mahamarg AccidentSaamtv
Published On

Accident On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर ११ डिसेंबर ते १९ जानेवारी म्हणजे ४० ते ४५ दिवसांत जवळपास २० अपघात झाले आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक दुसऱ्या दिवशी इथे अपघाताची घटना घडत आहे.

महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाल्याची बातमी सध्या समोर येत असून भरघाव वेगात असलेली कार कठडा तोडून खाली जाता जाता वाचली आहे. या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Samruddhi Highway)

Samrudhi Mahamarg Accident
Sangali News: काय सांगता! 'पोराला’ देवून चक्क “पोरीला” घेतले दत्तक; अनोख्या प्रकरणाची जिल्ह्यात रंगली चर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर वाहन चालकांना वेग मर्यादादेखील देण्यात आलेली आहे. परंतु काही वाहन चालक वेग मर्यादेचं उल्लंघन करताना दिसत असून अपघातांच्या संख्येतदेखील प्रचंड वाढ झाली आहे. अशाच वाढत्या वेगामुळे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात भीषण अपघाताची घटना घडली आहे.

Samrudhi Mahamarg Accident
7th Pay Commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगारवाढ
Summary

समोर आलेल्या माहितीनुसार, कार चालक बाळासाहेब धरम हे एकटेच आपल्या कार क्र. एम एच १७ सीएम ४०७४ मधून औरंगाबादहून शिर्डीच्या दिशेने येत असताना सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव कार समृद्धी महामार्गावर असलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन धडकली. सुरक्षा कट्टा असल्याने कार मधोमध अडकून राहिली. रस्त्यावरुन २०-२५ फुट खोल पुलावर कार कडेला अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

या भीषण अपघातात चालक सुदैवाने वाचला असून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महामार्ग पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी मदत कार्य करत क्रेनच्या साहाय्याने ही कार संरक्षण कठड्यावरून बाजूला काढली. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com