प्रातिनिधिक फोटो  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पोलिसांना पाहून घाबरला, थेट दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; नेमकं काय घडलं? वाचा...

Ravindra Dhangekar: पुण्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून एकाने दुसऱ्या मजल्यावरून उडाली मारली, ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत ही घटना बुधवारी रात्री घडली, असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रायन रुडॉल्फ गिअर, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला नाना पेठ परिसरातील एका इमारतीत पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी त्याठिकाणी असलेल्या एका फ्लॅटमध्ये छापा मारला.

फ्लॅटमध्ये असलेला व्यक्ती पोलिसांना पाहून घाबरला. पोलीस आल्याचे पाहताच त्याने कसलाही विचार न करता थेट खाली उडी मारली. ब्रायनने उडी मारल्यानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणात आता काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही उडी घेतली आहे. पुण्यातील अवैध धंद्यांना खीळ बसणार कधी? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना पोलीस दाबायचा प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना कोणतीच माहिती कशी नाही. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक जुगार अड्डे आहेत, ते कधी बंद होणार? कारण पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे दररोज निघत आहेत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करा आणि कारवाई करा, अशी मागणी धंगेकर यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT