Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची विजयी घौडदौड; कोणी मारली बाजी? जाणून घ्या

Mumbai University Senate Elections 2024 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची विजयी घौडदौड पाहायला मिळत आहे. या निडवणुकीत युवासेनेने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची विजयी घौडदौड; कोणी मारली बाजी? जाणून घ्या
Mumbai University Senate ElectionSaam tv
Published On

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा निकाल आज निकाल जाहीर झाला आहे. मुंबई विद्यापीठांच्या १० नोंदणीकृत १० पदवीधारांच्या जागांकरिता मंगळवारी २४ सप्टेंबर २०२४ मतदान पार पडलं होतं. आज या निवडणुकांची मतमोजणी पार पडली आहे. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे.

मुंबई विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या या १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्र आणि ६४ बूथवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी होती. या निवडणुकीसाठी एकूण मतदानाच्या फक्त 55 टक्के मतदान झालं होतं.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची विजयी घौडदौड; कोणी मारली बाजी? जाणून घ्या
Assembly Election : अमित शहांचं टार्गेट मुंबई; भाजपचं टेन्शन वाढलं?

या निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने चार उमेदवार उभे केले होते. तर मनसेने एक उमेदवार रिंगणात उतरवला होता. तर शिंदे गटाने या निवडणुकीत सहभाग नोंदवला नव्हता. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल युवासेनाच्या बाजूने लागला आहे. या निवडणुकीच्या ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ यांचा विजय झाला आहे. मयूर पांचाळ यांना ५३५० मते पडली आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची विजयी घौडदौड; कोणी मारली बाजी? जाणून घ्या
Assembly Election 2024: विदर्भ, मराठवाड्यानंतर मिशन मुंबई! अमित शहांची खास रणनिती; भाजप आमदारांचं टेन्शन वाढवलं

पाच आरक्षित जागांवर उमेदवारांना मिळालेली उमेदवारांना मते

महिला प्रवर्ग

युवासेना - स्नेहा गवळी - ५९१४ मते

अभाविप - रेणुका ठाकूर - ८९३ मते

SC प्रवर्ग

युवासेना - शीतल शेठ देवरुखकर - ५४८९ मते

अभाविप -राजेंद्र सायगावकर - १०१४ मते

Obc प्रवर्ग

युवासेना - मयूर पांचाळ - ५३५० मते

अभाविप - राकेश भुजबळ - ८८८ मते

ST प्रवर्ग

युवासेना - धनराज कोहचडे - ५२४७ मते

अभाविप - निशा सावरा -९२४ मते

NT प्रवर्ग

युवासेना - शशिकांत झोरे - ५१७० मते

अभाविप -अजिंक्य जाधव - १०६६ मते

खुला वर्ग

युवासेना - प्रदीप सावंत

युवासेना - मिलिंद साटम

युवासेना - अल्पेश भोईर

युवासेना - परम यादव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com