Devendra Fadnavis And Uddhav thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Pune: शिवसेना काँग्रेसला विकली, शाखाप्रमुखाचं उद्धव ठाकरेंना जळजळीत पत्र; तिकीट कापल्यानं कार्यकर्त्यानंही दिला भाजपला शाप

Pune Municipal Corporation Election: पुणे महानगर पालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शिवसेना कार्यकर्त्याने उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत राग व्यक्त केला. तर भाजप नेत्याने पक्षाला थेट शापच दिला.

Priya More

Summary -

  • पुण्यात तिकीट वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र नाराजी

  • शिवसेना शाखाप्रमुखाने उद्धव ठाकरे यांना जळजळीत पत्र पाठवले

  • काँग्रेससोबत युतीमुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष

  • भाजप कार्यकर्त्याने राग व्यक्त करत पक्षाला शाप दिला

अक्षय बडवे, पुणे

PMC Election: पुणे महानगर पालिका निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलेच तापले आहे. तिकीट वाटपावरून सर्वच राजकीय पक्षांमधील पदाधकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे आणि पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकाराल्यामुळे अनेक जण नाराज झाले असून ते आता राग व्यक्त करत आहेत. काहींनी सोशल मीडियावर पोस्ट करत तर काहींनी माध्यमांसमोर जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. तिकीट कापल्यामुळे संतप्त झालेल्या पुण्यातील एका कार्यकर्त्याने थेट भाजपला शाप दिला. याची आता पुण्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.

पुण्यात शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला गेला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या एका शाखाप्रमुखाने केला आहे. त्याने यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट पत्र पाठवले. पुण्यात शिवसेनेने काँग्रेससोबत युती केली. मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाही, असा आरोप या शाखाप्रमुखाने केला आहे. त्यामुळे शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना पोस्टाने पाठवले आहे. या पत्रात त्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे खंत व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे पुण्यामध्ये भाजपने तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्याने थेट पक्षाला शाप दिला. मुरलीधर मोहोळ, योगेश टिळेकरांवर भाजप कार्यकर्ता चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष युवराज कुचेकर यांनी मुरलीधर मोहोळ आणि योगेश टिळेकर यांच्यावर राग व्यक्त केला. तसंच पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला.

'मी २२ वर्षांपासून भाजपमध्ये काम करतोय. पण भाजपने माझ्यावर अन्याय केला. काँग्रेसचे आयात उमेदवार आमच्या बोकांडी आणून ठेवलेत. आमदाराने सांगितलं त्या मुरली मोहोळने केलंय मुरली अण्णा मोहोळ म्हणाला तुमच्या योगेशअण्णा टिळेकरने केलंय. पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसने नाही.पक्षात कार्यकर्ते नव्हते का? मी काय पेटवून घेणार नाही पण हे आपोआप पेटणार आहेत. कारण काँग्रेसचा आयात उमेदवार १०० टक्केपडणार आहे.', असे आक्रमक विधान युवराज कुचेकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना मतदान, ना निकाल, त्याआधीच भाजपचे ६ नगरसेवक विजयी; २४ तासांत काय राजकारण घडलं? VIDEO

Cabinet Decision: वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळात अंबादेवी संस्थानबाबत मोठा निर्णय

बॉम्ब से उडा दूंगा... संजय राऊत यांना धमकी, मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथक थेट घरी पोहोचले, VIDEO

New Year Resolution 2026: नवीन वर्षात, नवीन सुरूवात; स्वत:साठी करा हे संकल्प

New Zealand New Year Celebration Video: जगात सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन का होतं? बघा VIDEO

SCROLL FOR NEXT