pune news Saam tv
मुंबई/पुणे

जेलमधून गुंड लढले, निवडणूक जिंकले; गुंडांच्या गुंडगिरीला जनतेचा कौल

pune news : कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या गुंडांना आता जनतेनं डोक्यावर घेतलंय.. ते नेमकं कसं... आणि किती गुंडांनी जेलमधून निवडणूक लढवली आणि जनतेनं कुणाला कौल दिलाय..पाहूयात.

Bharat Mohalkar

पुणे तिथं काय उणे म्हणतात ते काही खोटं नाही... कारण कोयता गँग, दिवसा ढवळ्या सुरु असलेलं गँगवॉर, खंडणीखोरी...यातील आरोपींना राजकीय नेत्यांनीच नाही तर आता लोकांनीही डोक्यावर घेतलंय....

आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या गुंड लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तुरुंगात असतानाही त्यांच्यावर पुणेकरांनी मतांचा अक्षरशः वर्षाव केलाय...

जणू काही गुंडांच्या सुधार कार्यक्रमाअंतर्गत गुंडांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुणे महापालिकेच्या प्रभाग 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना उमेदवारी दिली... यानंतर लोकांनीही रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांना पराभूत करत गुंडांना कौल दिला. आता लोकांपाठोपाठ कोर्टही आपल्याला न्याय देईल, असा दावा आंदेकरांनी केलाय..

खरंतर देशाच्या संसदेतील 543 पैकी 170 खासदारांवर बलात्कार, खून, अपहरणासारखे गंभीर गुन्हे आहेत.. तर महाराष्ट्राच्या विधानसभेतही 106 आमदारांवर गंभीर गुन्हे आहेत....त्यापाठोपाठ आता महापालिका निवडणुकीतही जनता गुंडांच्याच मागे उभे राहताना दिसतेय.. त्यामुळे पुण्यात कोयता गँग, खंडणी, हत्या, गँगवॉर यातून कायदा सुव्यवस्थेच्या धिंडवडे काढण्याला आता जनतेनं आशिर्वाद दिल्यानं पुण्याचं उणेपण दाखवणारी एवढीच गोष्ट पाहायची बाकी होती... अशीच भावना राज्यातील नागरिकांची आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MMR मध्ये बविआनं रोखला भाजपचा रथ; वसई- विरारमध्ये बविआ अभेद्य

Explainer : मुंबईतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुंरधर कोण? यशामागे नेमकी काय होती रणनीती? वाचा

BMC Election: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर; काँग्रेस, शिवसेना, RPIनंतर भाजपला संधी

मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर; तुमच्या वॉर्डाचा नगरसेवक कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

Explainer : मुंबईत घराणेशाहीला धक्का, तरी काहींना कौल; मुंबईकरांनी निकालातून काय संदेश दिला?

SCROLL FOR NEXT