Pune Dogs Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Dogs: पुणे पालिकेचा गजब कारभार! भटक्या कुत्र्यांची होणार गणना; 25 लाखांचा खर्च करणार

Pune Corporation: पुणे महानगर पालिकेकडून कुत्र्यांचे गणना केली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून २५ लाखांचा खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More
  • पुणे महापालिका भटक्या कुत्र्यांची नवीन जनगणना करणार

  • या प्रकल्पासाठी तब्बल २५ लाख रुपयांची निविदा जाहीर

  • मागील वर्षी पुण्यात कुत्रा चावण्याच्या ३०,६१३ घटना नोंदल्या गेल्या

अक्षय बडवे, पुणे

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. केवळ काही हजारांत कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया होत असताना आता पुणे महापालिकेने श्वानांची गणना करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची निविदा जाहीर केली आहे. मागील वर्षी कुत्रा चावण्याच्या सुमारे ३० हजार ६१३ घटना घडल्या असल्याची माहिती आहे.

मात्र असं असतानाच आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी २५ लाख रुपयांचे टेंडर जारी करण्यात आले आहे. या टेंडरची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट श्वानांची गणना करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करणे, ऍप्लिकेशन विकसित करणे आणि त्याची गणना करणे अशी निविदा जारी करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये ३२ गावांचे अधिकृतपणे महापालिका हद्दीत विलीनीकरण झाल्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नवी जनगणना करण्यात येणार आहे. या मोहिमेत जुन्या पुणे परिसरांपासून ते नव्याने समाविष्ट झालेल्या भागांपर्यंत विस्तारित शहराचा कानाकोपरा समाविष्ट असणार आहे. ही मोहीम जवळपास वर्षभर चालेल आणि त्यासाठी अंदाजे २५ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

mahatenders.gov या वेबसाईटवर खासगी संस्थांना निविदा भरता येणार आहे. १ वर्षासाठी या कामाची मुदत असून २५०० रुपये बयाणा आहे तर निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट आहे. ५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२३ मध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची गणना करण्यात आली होती. त्यावेळी एका खासगी संस्थेने १३ लाख रुपयांची निविदा भरली होती. २०२३ मध्ये गणना केल्यानंतर सद्यस्थित शहरात १ लाख ७९ हजार मोकाट कुत्रे असल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

कुत्रे मोजणार, मोबाईल ऍप्लिकेशन तयार करणार -

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या संख्येवर आहे हीच संख्या निश्चित करण्यासाठी गणना केली जाणार आहे. पुणे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दर ५ वर्षांनी शहरातील भटके श्वान मोजण्यासाठी निविदा जारी केली जाते. यंदा देखील ती जारी करण्यात आली आहे ज्यामध्ये यंदा प्रथमच एक मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलं जाणार आहे. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून वॉर्ड किंवा प्रभाग निहाय कुत्र्यांची संख्या निश्चित केली जाईल.

महापालिकेकडून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते पकडलेल्या ठिकाणी परत सोडले जातात. या कामासाठी वेगवेगळ्या संस्थांची नियुक्ती केली जाते. महापालिकेने २०२३ पूर्वी २०१८ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना केली होती.

वर्षानिहाय कुत्रा चावण्यांच्या घटनांची आकडेवारी -

मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या हजारो घटना पुणेकरांनी आजवर पाहिल्या असतीलच. अनेक सामाजिक संस्थांनी या घटना कमी होण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र असं असताना सुद्धा मागील वर्षी पुणे शहरात कुत्रा चावण्याच्या ३० हजार घटनांची नोंद आहे.

२०२२: १६ हजार ५६९ घटना

२०२३: २२ हजार ९४५

२०२४: २५ हजार ८९९

२०२५: ३० हजार ६१३

मोकाट कुत्रे मोजायला लाखो रुपये -

मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी लहान मंडळी, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले पुण्यात नवीन नाहीत. तसेच काही भागात शब्दशः टोळीने राहणारी ही मोकाट कुत्री रात्रीच्या वेळी प्रचंड मोठ्या व विचित्र आवाजात विव्हळल्याने नागरिकांच्या झोपा सुद्धा उडतात. अशातच आता २५ लाख रुपये खर्च करून महापालिका कुत्र्यांची गणना करणार असून त्याच्यासाठी एक ऍप्लिकेशन सुद्धा तयार करणार असल्यामुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

'आता पुण्यात कुत्रे मोजण्याची मोहीम सुरू होणार आहे पण यात नक्की कुत्रे मोजली जाणार का त्याची येणारी बिलं? कारण कुत्रे मोजून त्यातून कुत्रे चावण्याच्या घटना कमी होणार आहेत का? तब्बल २५ लाख रुपये खर्च होणार आहेत त्यामुळे खरं श्वान मोजली जाणार का कुत्र्यांच्या भाषेत ही मोहीम कागदावर भू - भू राहणार?', असा संतप्त सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

SCROLL FOR NEXT