Pune Municipal Corporation officials microchipping a stray dog as part of the new initiative to track sterilization and vaccination. Saam Tv
मुंबई/पुणे

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

New Initiative in Pune: पुण्यातील भटक्या कुत्र्यांच्याची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आता पुणे महापालिकेने एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय..पाहुयात काय आहे हा प्रकल्प आणि कशी केली जाणार या प्रकल्पाची अंमलबजावणी..

Omkar Sonawane

पुण्यातल्या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची ही दहशत दिवसेंदिवस वाढत चाललीय..कारण पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल अडीच लाखांच्यावर गेलीय. दिवसाला कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या 80 ते 90 घटनांची नोंद होतेय.. यावर नियंत्रण आणण्यासाठी नसबंदीची मोहीम राबवली जाते. मात्र आता कुत्र्यांची वाढती संख्या रोखणं शक्य नसल्यानं पुणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय घेतलाय. नेमका याची अंमलबजावणी कशी होणार

या मायक्रो चिप कुत्र्यांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचल्या जाणार आहेत. या चिपमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्या चीपचा १५ अंकी क्रमांक ही त्या कुत्र्याची ओळख असेल. सुरुवातीच्या टप्प्यात सहाशे कुत्र्यांना मायक्रोचिप लावण्यात येणार आहे.

कुत्र्यांच्या या विशिष्ट क्रमांकामुळे नसबंदी, लसीकरणाची अद्ययावत माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल. तसचं ही मायक्रोचिप एकदा बसवावी लागेल...ही चीप बसवण्याचा खर्च प्रत्येकी हजार रूपयांपर्यंत येणार आहे. मात्र या मायक्रोचीपचा खरंच फायदा होणार का..यामुळे कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणात येणार का? हे येणाऱ्या काळातच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

SCROLL FOR NEXT