PMC News : व्यसनमुक्तीच्या चळवळीला पुणे पालिकेची पोचपावती; डॉ. सोमनाथ गितेंचा विशेष सत्कार meta ai
मुंबई/पुणे

PMC News : व्यसनमुक्तीच्या चळवळीला पुणे पालिकेची पोचपावती; डॉ. सोमनाथ गितेंचा विशेष सत्कार

Pune Municipal Corporation : व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सोमनाथ गिते यांचा पुणे महापालिकेकडून विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत केलेला हा सन्मान व्यसनमुक्तीच्या चळवळीला प्रोत्साहन देणारा आहे.

Saam Tv

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा मा. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुणे शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी आयोजित या विशेष समारंभात डॉ. गिते यांच्या सामाजिक व व्यसनमुक्ती क्षेत्रातील दीर्घकालीन कार्याची दखल घेण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यसनमुक्ती जनजागृती, युवक प्रबोधन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.

डॉ. गिते यांनी राज्यभरातील युवक, पालक आणि नागरिकांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीबाबत सातत्याने प्रबोधन केले आहे. व्यसनाधीन व्यक्ती तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेत मदत करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. गिते यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली असून, व्यसनमुक्ती व सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याशी संबंधित विविध जागतिक विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध सन्मानांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. डॉ. गिते यांच्या कार्याला विविध मान्यवर, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनीही वेळोवेळी पाठिंबा व कौतुकाची दाद दिली आहे. त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारी प्रशंसापत्रे व शिफारसपत्रेही विविध स्तरांवरून प्राप्त झाली आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने झालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याची महत्त्वपूर्ण दखल मानली जात असून, या सन्मानामुळे व्यसनमुक्तीच्या कार्याला आणखी व्यापक स्वरूप देण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना डॉ. गिते यांनी व्यक्त केली.

“हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या या प्रवासात साथ देणाऱ्या कुटुंबीयांचा, सहकाऱ्यांचा, मित्रांचा आणि माझ्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. समाजातील युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त, सुसंस्कारित व सशक्त पिढी घडविण्यासाठी यापुढेही सातत्याने कार्य करत राहू,” असे डॉ. गिते यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सुरू असलेली त्यांची जनजागृतीची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

Diwali For Diabetes Patient: डायबिटीजच्या रूग्णांनी दिवाळीचा फराळ खावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

Pune News: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडाल तर खबरदार, पुणे महानगरपालिकेकडून नियमावली जारी

अखेर गोकुळचा अध्यादेश निघाला; सरकारच्या 4 संचालकांची नेमणूक|VIDEO

Walking For Weight Loss: एका आठवड्यात १ किलो वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती तास चालावे? जाणून घ्या

Traditional Mangalsutra For Women: महिलांसाठी ट्रेडिशनल मंगळसूत्र डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर दिसतील उठून

SCROLL FOR NEXT