Pune news  saam tv
मुंबई/पुणे

Pune : मोडकळीस आलेल्या ४५० वाड्यांना पुणे महापालिकेकडून नोटिसा; नागरिक म्हणाले...

पुणे महापालिका (PMC) पावसाळा आला की या जुन्या वाड्यांना आणि इमारतीना नोटिसा देते. यावर्षीही जवळपास ४५० वाड्यांना नोटिसा दिलेल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : पुण्याची वाड्याचं शहर म्हणून ओळख आहे. हे वाडे जपले पाहिजे, इतिहास राहिला पाहिजे असं पुणेकर म्हणणं आहे. मात्र, पुणे महापालिका (PMC) पावसाळा आला की या जुन्या वाड्यांना आणि इमारतीना नोटिसा देते. यावर्षीही जवळपास ४५० वाड्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pune News In Marathi )

पुणे (Pune) शहर शिक्षणाचं माहेरघर आणि पेठाचं शहर...या पेठात जुने वाडे आहेत. या वाड्याचं वयोमर्यादा ही संपून गेली आहे. जवळपास दोनशे तीनशे वर्षाच्या पूर्वीचे वाडे आहेत. या वाड्यात राहणारे लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मात्र, महापालिकेने नोटीस न देता इतिहास जपला पाहिजे. या वाड्याची जपवणूक करण्यासाठी महापालिकेने वेगळा निधी ठेवला पाहिजे अन् वाडे न पाडता त्याला वाचवले पाहिजे, असं येथे राहणाऱ्या नागरिकांना वाटते.

दरम्यान, पुण्यातील अतीधोकादायक जुने वाडे पालिकेकडून पाडण्यातही आले आहेत.या वाड्याची अवस्था फार बिकट आहे.महापालिकेने या वाड्याचे श्रेणी केल्या आहेत.यामध्ये एकुण ४७८ वाडे आहेत त्यातील ४८ वाडे महापालिकेने गेले काही महिन्यांत पाडले आहेत.

पुणे महापालिका पावसाळा आला की वाड्यांना नोटिसा देते. मात्र,परत काहीच करत नाही.त्यामुळे अशा वाड्याचा इतिहास जपला पाहिजे.वाड्यातील मालक आणि भाडेकरू प्रश्न मिटवून वाडे वाचवले पाहिजेत,अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र,नागरिकांच्या आवाहनानंतर पुणे महापालिका काय भूमिका घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT