CM Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

Pune Municipal Corporation Election 2026: पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची अंतिम यादी समोर आली आहे. भाजपने पुण्यामध्ये नातेवाईकांना डावललं आणि निष्ठावंतांना संधी दिली. तिकीट वाटपावरून भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले.

Priya More

Summary -

  • पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण उमेदवार यादी जाहीर

  • ४१ प्रभागांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी

  • पुण्यात भाजपने नातेवाईकांना डावललं आणि निष्ठावंतांना संधी दिली

  • थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित करण्यात आली.

अक्षय बडवे, पुणे

पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ऐनवेळी पक्षाने तिकीट कापल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. पुण्यामध्ये भाजपने ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापलं. त्यामुळे त्यांनी राग व्यक्त करत बंडखोरी केली आणि थेट भाजपला इशारा दिला. पुण्यात भाजपने नातेवाईकांना डावललं आणि निष्ठावंतांना संधी दिली. पुण्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांची यादी समोर आली आहे.

भाजपकडून रविवारी संध्याकाळपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होणे अपेक्षित होते. पण उमेदवारांची यादी जाहीर करण्यापेक्षा भाजपने थेट उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यानंतर पुण्यात महायुतीमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली होती. पण शेटवची मंत्री उदय सामंत यांनी या अफवा असल्याचे सांगितले. पुण्यामध्ये भाजपने प्रभाग क्रमांक १ ते ४१ मध्ये उमेदवारांना संधी दिली. या सर्व उमेदवारांची यादी आपण पाहणार आहोत...

पुण्यात भाजपने कोणत्या वॉर्डमधून कुणाला दिली उमेदवारी?

१) प्रभाग क्रमांक १ – कळस धानोरी

राहुल भंडारे, संगिता दांगट, वंदना खांडवे, अनिल टिंगरे

२) प्रभाग क्रमांक २ – फुलेनगर नागपूर चाळ

रेणुका उगले-चालवादी, सुधीर वाघमोडे, पूजा जाधव, राहुल जाधव

३) प्रभाग क्रमांक ३ – विमाननगर लोहगाव

श्रेयस खांदवे, अनिल सातव, ऐश्‍वर्या पठारे, रामदास दाभाडे

४) प्रभाग क्रमांक ४ – खराडी वाघोली

शैलजीत बनसोडे, रत्नमाला सातव, तृप्ती भारणे, सुरेंद्र पठारे

५) प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगाव शेरी

नारायण गालंडे, श्‍वेता गालंडे, कविता गलांडे, योगेश मुळीक

६) प्रभाग क्रमांक ६ – येरवडा गांधीनगर

संतोष आरडे, ईशा विटकर, संगीता धुमाळ, संजय भोसले

७) भाग क्रमांक ७ – गोखले नगर वाकडेवाडी

निशा मानवटकर, सायली माळवे, रेश्‍मा भोसले, हरीश निकम

८) प्रभाग क्रमांक ८ – औंध बोपोडी

परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, सनी निम्हण

९) प्रभाग क्रमांक ९ – सुस बाणेर पाषाण

रोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मयूरी कोकाटे, लहू बालवडकर

१०) प्रभाग क्रमांक १० – बावधन भुसारी कॉलनी

किरण दगडे, रुपाली पवार, अर्पना वर्पे, दिलीप वेडेपाटील

११) प्रभाग क्रमांक ११ – रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर

अजय मारणे, शर्मिल शिंदे, मनीषा बुटाला, अभिजीत राऊत

१२) प्रभाग क्रमांक १२ – शिवाजीनगर मॉडेल कॉलनी

अमृता म्हेत्रे, अपूर्व खाडे, पूजा जगडे, डॉ. निवेदिता एकबोटे

१३) प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन जय जवान नगर

निलेश अल्हाट, शोभा मेमाणे, अश्‍विनी भोसले, सोनू निकाळजे

१४) प्रभाग क्रमांक १४ – कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा

हिमाली कांबळे, किशोर धायरकर, मंगला मंत्री, उमेश गायकवाड

१५) प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक केशवनगर

नंदा अबनावे, डॉ. महादेव कोद्रे, सारिका घुले, शिवराज घुले

१६) प्रभाग क्रमांक १६ – हडपसर सातववाडी

शिल्पा होळे, उज्ज्वला जंगले, आबा तुपे, संदीप दळवी

१७) प्रभाग क्रमांक १७ – रामटेकडी माळवाडी वैदुवाडी

खंडू लोंढे, शुभांगी होळे, पायल तुपे, प्रशांत तुपे

१८) प्रभाग क्रमांक १८ – वानवडी साळुंखे विहार

धनराज घोगरे, कालिंदी पुंडे, कोमल शेंडकर, अभिजीत शिवरकर

१९) प्रभाग क्रमांक १९ – कोंढवा खुर्द कौसर बाग

नूर फातिमा हुसेन खान, सुप्रिया शिंदे, सतपाल पारघे, अमर गव्हाणे

२०) प्रभाग क्रमांक २० – शंकर महाराज मठ बिबवेवाडी

राजू शिळीमकर, मानसी देशपांडे, महेंद्र सुंदेचा, त्वनी दिवेकर

२१) प्रभाग क्रमांक २१ – मुकुंद नगर सॅलिसबरी पार्क

प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर, मनीषा चोरबोले, श्रीनाथ भिमाले

२२) प्रभाग क्रमांक २२ – काशेवाडी डायस प्लॉट

मृणाल कांबळे, संदीप लडकत, अर्चना पाटील, विवेक यादव

२३) प्रभाग क्रमांक २३ – रविवार पेठ नाना पेठ

पल्लवी जावळे, अनुराधा मंचे, ऋतुजा गडाळे, विशाल धनावडे

२४) प्रभाग क्रमांक २४ – कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय, केएमई रुग्णालय

कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव, देवेंद्र वडके, गणेश बिडकर

२५) प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ महात्मा फुले मंडई

स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक

२६) प्रभाग क्रमांक २६ – घोरपडे पेठ गुरुवार पेठ समताभूमी

विष्णू हरीहर, प्रज्ञा माळवदे, ऐश्‍वर्या थोरात, अजय खेडेकर

२७) प्रभाग क्रमांक २७ – नवी पेठ पर्वती

अमर आवळे, स्मिती वस्ते, लता गौड, धीरज घाटे

२८) प्रभाग क्रमांक २८ – जनता वसाहत हिंगणे खुर्द

वृषाली रिठे, मनीषा बोडके, विनया बहुलिकर, प्रसन्ना जगताप

२९) प्रभाग क्रमांक २९ – डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी

सुनील पांडे, मंजुर्षी खर्डेकर, मिताली सावळेकर, पुनीत जोशी

३०) प्रभाग क्रमांक ३० – कर्वेनगर हिंगणे होन कॉलनी

सुशील मंगडे, रेश्‍मा बराटे, तेजश्री पवळे, राजाभाऊ बराटे

३१) प्रभाग क्रमांक ३१ – मयूर कॉलनी कोथरूड

दिनेश मथवड, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, पृथ्वीराज सुतार

३२) प्रभाग क्रमांक ३२ – वारजे पॉप्युलर नगर

हषर्दा भोसले, सायली वांजळे, भारतभूषण बराटे, सचिन दोडके

३३) प्रभाग क्रमांक ३३ – शिवणे खडकवासला धायरी पार्ट

धनश्री कोल्हे, ममता दांगट, सुभाष नाणेकर, किशोर पोकळे

३४) प्रभाग क्रमांक ३४ – नर्हे वडगाव बुद्रूक धायरी

हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, राजाभाऊ लायगुडे

३५) प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी माणिकबाग

ज्योती गोसावी, मंजुषा नागपुरे, सचिन मोरे, श्रीकांत जगताप

३६) प्रभाग क्रमांक ३६ – सहकारनगर पद्मावती

वीणा घोष, शैलजा भोसले, सई थोपटे, महेश वाबळे

३७) प्रभाग क्रमांक ३७ – धनकवडी कात्रज डेअरी

बाळा धनकवडे, वर्षा तापकीर, तेजश्री बदक, अरुण राजवाडे

३८) प्रभाग क्रमांक ३८ – बालाजीनगर आंबेगाव कात्रज

अश्‍विनी चिंदे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा चोर्गे, व्यंकोजी खोपडे

३९) प्रभाग क्रमांक ३९ – अप्पर सुपर इंदिरानगर

वर्षा साठे, दिगंबर धवरी, रुपाली धाडवे, बाळा ओसवाल

४०) प्रभाग क्रमांक ४० – कोंढवा बुद्रुक येवलेवाडी

अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम, रंजना टिळेकर

४१) प्रभाग क्रमांक ४१ – महंमदवाडी उंड्री

प्राची आल्हाट, जीवन जाधव, स्नेहल दगडे, अतुल तरवडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाआधीच भाजपच्या खात्यात ४ था विजय, कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल|VIDEO

Hair Care: लांब घनदाट आणि शाईनी केस पाहिजेत? मग आजीने सांगितलेला हा नुस्खा नक्की करा ट्राय

महापालिका निवडणुकीत हलगर्जीपणा; 1200 कर्मचाऱ्यांना नोटिस|VIDEO

Blouse Designs: सिल्कच्या साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज प्रकार, तुम्हीही ट्राय करा

Maharashtra Live News Update: मुंबईतील भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द करण्याची मागणी, अनधिकृत बांधकामाचा आरोप

SCROLL FOR NEXT