pune viral video  Saam tv
मुंबई/पुणे

Viral Video : पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव ट्रकमधून चालकाने मारली उडी; यानंतर घडलेले थरारनाट्य कॅमेरात कैद

महामार्गावर ट्रक चालवाताना ब्रेक झाला. त्यानंतर घाबरलेल्या चालकाने थेट भरधाव ट्रकमधून उडी मारली.

दिलीप कांबळे

Pune News : पुणे-मुंबई महामार्गावरील भरधाव ट्रकचा अपघात झाला आहे. या महामार्गावर ट्रक चालवाताना ब्रेक झाला. त्यानंतर घाबरलेल्या चालकाने थेट भरधाव ट्रकमधून उडी मारली. मात्र, हा विना चालक ट्रक सुसाट वेगाने पुढे जाऊन दुभाजकाला धडकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ब्रेक फेल झाल्याने विना चालक धावणाऱ्या ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

पुण्याहून सिमेंटच्या गोणी घेऊन ट्रक मुंबईला निघाला होता. तेव्हाच बोर घाटात अमृतांजन पुलाच्या आधी ट्रकचा ब्रेक फेल झाला. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास या ब्रेक फेल झालेल्या ट्रकची सुरुवातीला बसला धडक बसली. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने ट्रकखाली उडी घेतली. मात्र, ट्रक तसाच सुसाट वेगाने पुढं गेला आणि दुभाजकाला धडकत धावत राहिला. अमृतांजन पुलापुढे गेल्यावर ट्रक थांबला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. (Maharashtra News)

ब्रेक फेल झाल्याने विना चालक ट्रक मुंबई-पुणे महामार्गावर धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बोर घाटात आमृतांजन पुलाजवळ हा ट्रक विना चालकाचा सुसाट धावला आहे. धक्कादायक दुर्घेटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, पुण्यातील नवले पुलावर असंख्य वाहनांना एका अवजड वाहनाने धडक दिली. अगदी तसाच काहीसा इथं ही घडला असता. परंतु तसे काही न घडल्याने अपघाताचा मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT