Pune-Mumbai Expressway  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबईचं अंतर होणार कमी! मिसिंग लिंक एक्सप्रेसवेनं प्रवासाचा वेळ वाचणार, कधीपर्यंत पूर्ण होणार काम?

Pune-Mumbai expressway updates: बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक हा भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक प्रमुख मैलाचा दगड आहे. टायगर व्हॅली पूल पूर्ण करण्यास विलंब झालाय.

Bharat Jadhav

पुणे-मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत नवी अपडेट समोर आलीय. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने जाहीर केलीय. या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग (YCEW) मिसिंग लिंक असे नाव देण्यात आले आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट गर्दी कमी करणे आणि मुंबई आणि पुणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे, प्रवासाची गती आणि सुरक्षितता वाढवणे आहे. तर ६,६९५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासात परिवर्तन घडवून आणेल. या प्रकल्पाचं काम ८५ टक्के पूर्ण झाले असल्याची पृष्टी MSRDC अधिकाऱ्यांनी दिलीय. जेव्हा हा मार्ग कार्यान्वित होईल तेव्हा मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबईतील अंतर कमी होईल.

असा आहे प्रकल्प

मिसिंग लिंक प्रकल्प दोन प्रमुख अंमलबजावणी पॅकेजमध्ये विभागला गेला आहे:

• पॅकेज-I: 1.75 किमी आणि 8.92 किमीचे आठ लेन असलेले दोन बोगदे.

• पॅकेज-II: 790 मीटर आणि 650 मीटरचे दोन आठ-लेन व्हायाडक्ट.

सध्या, सहा पदरी द्रुतगती मार्ग आणि चार पदरी NH-4 या दोन्ही मार्गावरील वाहतूक खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र होते. तर खंडाळा एक्झिटजवळ वळते. परंतु या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. विशेषतः जेव्हा येथे भूस्खलनादरम्यान मोठी गर्दी होत असते. या अडथळ्यामुळे मुंबई-पुण्यातील अंतर वाढतं कारण वाहनांचा वेग कमी असतो. त्यामुळेप्रवासाचा वेळ वाढतो. तर घाटातील वळणावर वाहनांच्या वेगात बदल होतो आणि त्यामुळे अपघात घडतात. यामुळे हा मिसिंग लिंक प्रकल्प केला जात आहे.

मिसिंग लिंकचे फायदे

अंतर कमी करणे: मार्गावरून 13 किमी अंतर कमी होईल आणि घाट विभागातील वळणे काढण्यात येतील.

वेळेची बचत: पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ २०-२५ मिनिटांनी कमी होणार.

सुरक्षितता सुधारणा: अपघात कमी करण्यासाठी गर्दी आणि तीक्ष्ण वळणे कमी होतील.

पर्यावरणीय फायदे: इंधनाचा वापर आणि प्रदूषण पातळी कमी होईल.

असा आहे प्रकल्प

आशियातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज: लोणावळा घाट भागातील टायगर व्हॅलीवरील पुलाचं बांधकाम होत आहे. बोगदा विभाग आणि दुसरा पूल ९८ टक्के पूर्ण झाला आहे. मात्र टायगर व्हॅली केबल-स्टेड ब्रिज मागे पडलाय. तो पूल आता २०२५ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT