Pune-Mumbai Deccan Queen Completes 92 years ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

Deccan Queen : दख्खनची राणी झाली ९२ वर्षांची; पुणे स्टेशनवर वाढदिवस उत्साहात

Pune-Mumbai Deccan Queen Completes 92 years : यावेळी इंजिनचे पूजन करत चालकाचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : मुंबई आणि पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन (Deccan Queen) या रेल्वेला ९२ वर्षे पूर्ण झाली असून आज १ जूनला या रेल्वेचा ९३ वाढदिवस (Birthday) पुणे जंक्शनवर उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) आज सकाळी (बुधवार) डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. (Pune-Mumbai Deccan Queen Express Completes 92 years, Celebrates 93rd Birthday On Pune Junction)

हे देखील पाहा -

प्रथेप्रमाणे रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सलग दोन वर्षे वाढदिवशी डेक्कन क्वीनचा रेक मुंबई यार्डातच होता. यावेळी इंजिनचे पूजन करत चालकाचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, पुणे स्टेशनचे संचालक एस. सी. जैन यांच्या सह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.

दख्खनची राणी का म्हटले जाते?

महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांत १ जून १९३० ला ‘डेक्कन क्वीन’ ची सुरवात झाली. मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वे दाखल करण्यात आली होती. ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते. ज्याला ‘दख्खनची राणी’ (‘दख्खन की रानी’) असेही म्हटले जाते.

डेक्कन क्वीन ट्रेनची विशेष वैशिष्टे

जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता आहे. तसेच 9 - द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता आहे. अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे. डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.

डेक्कन क्वीनचा इतिहास (Histroy Of Deccan Queen)

दख्खनची राणी १ जून १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू झाली. त्या वेळेस ती फक्त शनिवारी-रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई आणि पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला आणि दख्खनची राणी या दोन शहरांदरम्यान रोज धावू लागली. सुरुवातीला ही गाडी लक्झरी गाडी म्हणून सुरू झाली, त्यामुळे तिच्यात फक्त वरचे दोन वर्ग होते. ह्या गाडीचा पहिला प्रवास कल्याण ते पुणे असा झाला. आता ती कल्याणला थांबत नाही. मुंबईच्या दिशेने जाताना दादर आणि पुण्याच्या दिशेने जाताना शिवाजीनगर हे दोन थांबे सुरुवातीला अनेक वर्षे नव्हते. डेक्कन क्वीनने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे ३,५०० इतकी आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

Railway Jobs: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पात्रता आणि अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT