Latest Pune Crime news Saam Tv News
मुंबई/पुणे

पुण्यात चाललंय काय? फेशर्स पार्टीच्या नावाखाली पोरं पबमध्ये दारू पिऊन तर्राट, मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकताच...

Latest Pune Crime news: पुण्यातील राजाबहादूर मिल्समधील किकी पबमध्ये फ्रेशर्स पार्टीदरम्यान अल्पवयीन मुलांना दारू पुरवली जात असल्याचा आरोप. मनविसे कार्यकर्त्यांनी छापा टाकत पार्टी तातडीने बंद पाडली.

Bhagyashree Kamble

  • किकी पबमध्ये पार्टीदरम्यान अल्पवयीन मुलांना दारू पुरवली जात असल्याचा आरोप.

  • मनविसे कार्यकर्त्यांनी छापा टाकत पार्टी तातडीने बंद पाडली.

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही कारवाईदरम्यान उपस्थित.

  • "अल्पवयीन मुलांना दारू पाजल्यास पब फोडला जाईल," असा मनविसेकडून पब चालकांना इशारा.

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राजाबहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबमध्ये नामांकित कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती. या पार्टीवर मनविसेने धडक देत पार्टी बंद पाडली.

यावेळी पब चालकांकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र तपासले गेले नाही. तसेच प्रवेशासाठी कोणतीही रेकॉर्ड रजिस्टरही ठेवले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. १७ ते २१ वयोगटातील अनेक विद्यार्थ्यांना विनाअडथळा प्रवेश देण्यात आले. तसेच त्यांना मद्यही पुरवण्यात आले, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी मनविसेच्या कार्यकर्त्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. मनविसेनं यावेळी पब चालकांना थेट इशाराही दिला. 'यापुढे जर कुठल्याही पब किंवा रेस्टॉरंटमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारू पाजली, तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवली जाणार नाही; संपूर्ण पब फोडून टाकला जाईल', असा इशारा मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिला.

या कारवाईमुळे पुणे शहरातील पब्समध्ये अल्पवयीन मुलांना सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPO 2025 : नवीन आयपीओची संधी! करंट इन्फ्राप्रोजेक्ट्सचे शेअर्स आता बाजारात

Maharashtra Live News Update: नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

Actor Death : जेष्ठ अभिनेत्याचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

Khushi Mukherjee: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी २५ लाखांची चोरी; घरातीलच व्यक्तीवर संशयाची सूई, पण कुणावर?

फडणवीसांवर राऊतांचा घणाघात; त्यांच्या आणि भाजपच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे Xगडे दिसाल,|VIDEO

SCROLL FOR NEXT