bapu pathare news :  Saam tv
मुंबई/पुणे

Bapu Pathare : १२ लोकांचा जमाव, लाथाबुक्क्यांनी मारहाण; शरद पवारांच्या आमदाराने सांगितली पुण्यातील राड्याची inside स्टोरी

bapu pathare news : अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चालक, बॉडीगार्डला देखील त्यांनी मारहाण केली.

Akshay Badve

आमदार बापू पठारे यांना काही लोकांकडून मारहाण

मारहाण करणारे कार्यकर्त्यांचा संबंध अजित पवार गटाशी असल्याचा आरोप

राड्यामागे महापालिका निवडणुकीचा संदर्भ असल्याचा पठारेंचा आरोप

पोलिसांत गुन्हा नोंदवण्यास उशीर झाल्याचा पठारेंचा आरोप

पुण्यात आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की झाली. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की झाल्याचा आरोप आमदार बापू पठारे यांनी कला. बापू पठारे यांना धक्काबुक्की झाल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. दोन मिनिटांत १२ लोक आली. त्यांनी माझ्या चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनास्थळी १०० लोक जमले होते, असं आमदार बापू पठारे यांनी धक्काबुक्कीचा थरारक प्रसंग सांगितला आहे.

शरद पवार गटाचे बापू पठारे यांनी धक्काबुक्कीचा थरारक प्रसंग सांगितला. यावेळी बापू पठारे यांनी सांगितलं की, मी काल रात्री एका कार्यक्रमाला गेलो होतो. लोहगाव या ठिकाणी बंडू खांदवे याने काही आंदोलन ठेवले होते. त्यांनी सांगितलं की, मी आंदोलन ठेवलं. तुम्ही का विरोध करता? असं म्हणत मला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. मग माझा चालकमध्ये आला. त्यालाही मारलं. माझ्या बॉडीगार्डला देखील मारलं. दोन मिनिटांत त्यांचे १२ लोक आले. माझ्या चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केलीये. १०० लोक जमा केली होती'.

'आम्ही पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेले होतो. माझ्या भावाच्या मुलाला देखील बेदम मारहाण केली. रस्त्याचा प्रश्न होता. ८ डिसेंबर २०२३ रोजी हे रस्ते मंजूर होते. पण त्यांनी रस्ते केले नाहीत. असे रस्ते करता येत नाहीत. पाइपलाइन आणि ड्रेनेज टाकावं लागतं. ते काम करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. रस्ते झाले नाहीत म्हणून आंदोलन करत राजकारण करण्याचा हा प्रकार होता म्हणून हे सगळे घडलं. रात्री उशीर झाला होता म्हणून गुन्हा दाखल झाला नाही, असे ते म्हणाले.

'ते मुद्दाम भांडण काढत आहेत. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करत आहेत. ते अजित पवार गटाचे आहेत. सुनील टिंगरे यांचे ते कार्यकर्ते होते. मात्र यात त्यांचा हात नाही. त्यांचे केवळ कार्यकर्ते होते. त्यांनी सगळं प्लॅन केलं होतं. आधीच लोक जमा केली होती. पोलीस रात्री गेले होते, पण रात्री जबाब नोंदवला गेला नाही. आमची लोक जखमी होती. आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आंदोलन करणार म्हणून आम्ही शिव्या दिल्या नाहीत. सगळे आंदोलन करू शकतात. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्यावर हल्ला केला. वेगळं वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. माझं सगळ्या नेत्यांशी बोलणं झालं. अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार देणार आहे. मारहाण करणाऱ्यावर ठोक कारवाई झाली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 26 ऑक्टोबरपासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू राहणार

Cough Syrup : कफ सिरप प्रकरणानंतर महाराष्ट्रात अलर्ट; अन्न व औषध प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

Pandharpur: विठ्ठल कोणाला पावणार? दादा की शिंदे, पंढरपुरातील महापुजेचा मानकरी कोण?

पोर्शे कार अपघात प्रकरणात ट्विस्ट; अग्रवाल कुटुंबाला सील केलेले MPG Club हॉटेल पुन्हा ताब्यात|VIDEO

Ananya Panday: ब्यूटी इन ब्लॅक...; ब्लॅक ड्रेस अन् कातिल नजर, अनन्या पांडेचा घायाळ करणारा लूक

SCROLL FOR NEXT