Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात रेस्क्यू केलेल्या १३ बांगलादेशी मुली पळाल्या, केअरटेकर अन् सुरक्षारकावर हल्ला केला नंतर...; VIDEO समोर

Pune News : पुण्यातील रेस्क्यू फाउंडेशनमधून १३ बांगलादेशी मुली केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला करून फरार. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पोलिसांची शोधमोहीम सुरू.

Alisha Khedekar

  • पुण्यातील रेस्क्यू फाउंडेशनमधून १३ मुली फरार

  • केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला करून पलायन

  • २ मुली ताब्यात, ११ अजूनही बेपत्ता

  • सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात काही दिवसांपूर्वी बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती. या महिला बनावट आधार कार्डचा वापर करून पुण्यात राहत होत्या. त्यानंतर आता पुण्यातील हडपसर, महंमदवाडी रोडवरील 'रेस्क्यू फाउंडेशन' या संस्थेमधून १३ बांगलादेशी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला करून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे महिला संरक्षण गृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका बांगलादेशी मुलीने औषध घेण्याच्या बहाण्याने संस्थेच्या केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांना दरवाजा उघडण्यास सांगितला. दरवाजा उघडताच इतर चार मुलींनी कांबळे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना वैद्यकीय कक्षात कोंडून ठेवले. त्याच वेळी संस्थेच्या आवारात साफसफाई सुरू असताना सुरक्षारक्षकाकडून मुख्य दरवाजा चुकून उघडा राहिला. याचा फायदा घेत १३ बांगलादेशी मुलींनी सुरक्षारक्षकाला ओढत आणि त्याचा चावा घेत तिथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच संस्थेने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सय्यदनगर आणि हडपसर परिसरात शोधमोहीम राबवून पळालेल्या मुलींपैकी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे, मात्र उर्वरित ११ मुली अद्याप बेपत्ता आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेबाबत हडपसर पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नसून केवळ 'जी.डी.' नोंद केली आहे.

रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था मानवी तस्करीतून वाचवलेल्या महिला आणि मुलींसाठी काम करते. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२४ पासून संस्थेला दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. याबाबत जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही संरक्षण पुन्हा देण्यात आले नव्हते.

संस्थेमध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त महिला वास्तव्यास आहेत. पलायन केलेल्या मुली या बांगलादेशी नागरिक असून त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालते. या प्रक्रियेला साधारण १ ते २ वर्षे लागतात, ज्यामुळे मुलींमध्ये नैराश्य येते आणि अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. सध्या संस्था सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या मदतीने बेपत्ता मुलींचा शोध घेत आहे. काळेपडळ पोलिसांकडून मुलींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : वजन कमी करण्यासाठी डाएटवर आहात, मग 'ही' हाय प्रोटीन रेसिपी एकदा ट्राय कराच

Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: जळगाव शहरातील MIDC परिसरातील चटई कंपनीला भीषण आग

परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

Health Care: उन्हाळ्यात खजूर खावे की नाही? काय होतात शरीराल फायदे?

SCROLL FOR NEXT