सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune Kondhwa Fire Death : पुण्यातील कोंढवा परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढव्यातील वेताळनगर येथे असलेल्या एका पेंटिंग साहित्याच्या गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत गंभीररी्या होरपळल्यामुळे एका ३५ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महंमद इरफान युसुफ (वय ३५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गोडाऊनमध्ये पेंटिंगसाठी लागणारे विविध साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आले होते. मालकाच्या सांगण्यावरून रात्रीच्या वेळी गोडाऊनच्या आतमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानक तिथे भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये केमिकल आणि पेंटिंगचे साहित्य असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत गोडाऊनमध्ये अडकलेल्या महंमद इरफान यांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
जवानांनी पाण्याचा मारा करत अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. गोडाऊनच्या वरील मजल्यावर आग पसरू न देण्यात जवानांना यश आले, ज्यामुळे शेजारील इमारती आणि रहिवाशांना होणारा एक मोठा धोका टळला. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कुलिंग (शीतकरण) करण्याचे काम सुरू होते.
या प्रकरणी गोडाऊनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना सुरक्षिततेची काळजी घेतली गेली होती का, याबाबत स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.