Pune Metro yandex
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रंगपंचमीला पुणे मेट्रो राहणार बंद

Metro: आज १३ मार्चला आपल्या राज्यात होळी साजरी होईल, तर १४ मार्चला धुळवड सण आयोजित केला जाईल. तसेच उद्या रंगपंचमीला पुणे मेट्रो सेवा बंद राहील.

Dhanshri Shintre

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. 14 मार्च 2025 रोजी देशभर होळीचा सण साजरा केला जाणार आहे. ज्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या राज्यात आज १३ मार्चला होळीचा सण साजरा होईल, तर १४ मार्चला धुळवड सण आयोजित केला जाईल. कोकणात शिमग्याची धूम सुरू झाली आहे. अशातच शुक्रवारी धुळवडीच्या सणानिमित्त पुणे मेट्रो सेवा विशिष्ट कालावधीसाठी बंद राहील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोकडून याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बंद राहील. दुपारी ३.०० वाजल्यापासून ते रात्री ११.०० वाजेपर्यंत मेट्रो सेवा पुन्हा नियमित सुरू होईल. पुण्यात सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मार्ग सुरू आहेत. धुळवड सणानिमित्त स्वच्छता आणि सुरक्षा कारणांमुळे ही सेवा बंद ठेवली जात आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी केली जात असल्याने मेट्रोच्या स्वच्छता आणि सुरक्षा कारणास्तव ही सेवा बंद ठेवली जाईल. यापूर्वी महामेट्रोकडून धुळवडीसह रंगपंचमीला आणि दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही काही कालावधीसाठी मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. हे पावले सुरक्षितता आणि सुविधांच्या दृष्टीने घेण्यात येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

ठाकरे बंधूंचं 'अब ती बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT