Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार, पुणे मेट्रो लाईन ३ च्या कामाची मोठी अपडेट समोर

Pune News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे, मेट्रो लाईन ३ चे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे. या माहितीवरुन मेट्रो लवकरच सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Pune Metro : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुणे मेट्रो प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ३ प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमिनीचा ९९.९४ टक्के भाग यशस्वीरित्या संपादित करण्यात आला आहे. याच दरम्यान राजभवनाने २६३.७८ चौरस मीटर जमिनीसाठी दिलेल्या परवानगीमुळे प्रकल्पाला आवश्यक असलेली जमीन प्राधिकरण विभागाला मिळाली आहे.

पुणे मेट्रो मार्गिका ३ ही सार्वजनिक आणि खासगी भागीदारी मॉडेलवर राबण्यात येत आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाला सरकारद्वारे मान्यता मिळाली. पीएमआरडीएने प्रकल्प राबवण्याच्या उद्देशाने मेट्रो सवलत कंपनी म्हणून पुणे आयडी सिटी मेट्रो रेल लिमिटेडसोबत सवलत करार मान्य केला.

पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'मार्गिका ३ चे ८३ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शेजारील राजभवन परिसरातील जमीन प्राधिकरणाद्वारे संपादित करण्यात आली आहे. या जमिनीचा वापर मेट्रो स्थानकाचा जिना बांधण्यासाठी केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे'.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे विद्यापीठाच्या जवळची राजभवनाची जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव नोव्हेंबर २०२२ मध्ये सादर करण्यात आला होता. आता अंतिम जमिनीच्या मंजुरीमुळे मेट्रो मार्गिका ३ प्रकल्पाच्या कामाला वेग येईल असा विश्वास प्राधिकरण विभागाला आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT