Pune Metro yandex
मुंबई/पुणे

Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो-३ कधीपर्यंत सुरू होणार? समोर आली नवी तारीख

September 2025 New Deadline for Pune Metro Line 3: पुणे मेट्रोच्या मार्ग ३ वरील काम पुन्हा एकदा अंतिम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही, याकारणामुळे आयटी क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Bhagyashree Kamble

पुणे मेट्रोच्या मार्ग ३ वरील काम पुन्हा एकदा अंतिम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. ज्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त केली जात आहे. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेला आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सुरूवातीला हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अंतिम मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.

पुणे मेट्रो मार्ग ३ पुन्हा विलंबित

पुणे मेट्रो मार्ग ३ हा शहरातील प्रमुख आयटी हब हिंजवडीला शिवाजीनगरशी जोडतो. त्यामुळे हा मार्ग आयटी प्रोफेशनलसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग २३.३३ किमी लांबीचा एलिव्हेटेड असून, सध्या ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

आयटी असोसिएशन इशारा

वारंवार होणाऱ्या विलंबामुळे आयटी असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. जर वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर अनेक आयटी व्यावसायिक पुण्याबाहेर स्थलांतर करण्याचा विचार करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. शहराच्या विकासासाठी तसेच वाहतुकीच्या सोयीसाठी हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून केली जात आहे.

आयटी नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

आयटी कर्मचारी रोड फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. 'आयटी हब सरकारला सर्वाधिक महसूल मिळवून देत आहेत. तरीही या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि वाहतूक व्यवस्था हा मोठा प्रश्न आहे. याठिकाणी जवळपास सहा लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे मेट्रोची तातडीने गरज आहे.

मात्र, सरकारने या मार्गाला प्राधान्य दिलेले नाही. जर मेट्रो मार्ग ३ चे काम लवकर काम पूर्ण झाले नाही, तर अनेक आयटी व्यावसायिक आणि कंपन्या पुण्याबाहेर स्थलांतर करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT