Pune Metro x
मुंबई/पुणे

Pune Metro : मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर! खडकी मेट्रो स्थानक सुरु होणार, पुणेकरांचा त्रास कमी होणार

Pune News : पुणे मेट्रो प्रकल्पातील खडकी मेट्रो स्थानक शनिवारी (२१ जून) प्रवाशांसाठी खुले होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट मार्गावर असलेल्या या मेट्रो स्थानकामुळे प्रवाशांचा प्रवास सहज आणि सुखकर होणार आहे.

Yash Shirke

पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खडकी मेट्रो स्थानक उद्या, शनिवार २१ जून २०२५ रोजी प्रवासी सेवेसाठी खुले होत आहे. हे स्थानक पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट मार्गावर आहे. या स्थानक प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे.

खडकी मेट्रो स्थानक हे खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रोमधून थेट रेल्वेसाठी प्रवेश मिळणार आहे. मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही सेवा एकाच ठिकाणी एकत्र आल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि अखंड होणार आहे. त्यामुळे रेल्वेने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

या स्थानकामुळे खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल आणि मुळा रस्ता या परिसरांमध्ये जाणं अधिक सोयीचं होणार आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्याने कामासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांचा प्रवास जलद आणि आरामदायक होईल.

पुणे मेट्रोच्या विस्तारामध्ये खडकी स्थानकाची भर पडल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळेल. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल, असे वक्तव्य पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. खडकी मेट्रो स्थानक सुरु होणार असल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच बाजी मारणार, एजबॅस्टननंतर लॉर्ड्सवरही इंग्लंडचा संघ फेल होणार; फक्त...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचला विश्वास कुमार, पण मानसिक धक्क्याने हदरला

Itchy Nose Relief: नाकात वारंवार खाज येते? 'या' उपायांनी घरच्या घरी सहज आराम मिळवा

Skin Care: मेकअपशिवाय मिळवा नेचरल पिंक ग्लो, फोलॉ करा या टिप्स

Food Infection: फूड पॉइजनिंगची लक्षणं कोणती? तब्येत बिघडल्यावर कशी काळजी घ्याल?

SCROLL FOR NEXT