Pune Metro x
मुंबई/पुणे

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो प्रवास करत घ्या बाप्पाचं दर्शन; गणेशोत्सवानिमित्त नवं वेळापत्रक जारी

Pune : गणेशोत्सवानिमित्त पुणे मेट्रो प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मेट्रोच्या प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ करण्याचे मेट्रो प्रशासनाने ठरवले आहे. यामुळे भाविकांना फायदा होणार आहे.

Yash Shirke

  • गणेशोत्सवानिमित्त पुणे मेट्रोचे वेळापत्रक बदलले; प्रवासाचा कालावधी वाढणार.

  • प्रमुख गणपती मंडपांना जाण्यासाठी भाविकांना मेट्रो मार्गे सोयीस्कर पोहोच मिळणार.

  • अनंत चतुर्दशीला सलग ४१ तास अखंड मेट्रो सेवा सुरू राहणार.

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Metro News : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळात पुण्यामध्ये फक्त देशातूनच नाही, तर परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात. तसेच गणेश मंडपांची आकर्षक सजावट आणि देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गावरील स्थानके – जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या दरम्यान पुणे मेट्रो सुरु झाली आहे. या पाच मेट्रो स्थानकांच्या आसपास शहरातील प्रमुख गणपती मंडळे आहेत. वाहतूक कोंडी टाळून मेट्रोमार्गे गणेशोत्सवाच्या मुख्य ठिकाणी भाविकांना पोहोचता येणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय पुणे मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या देखील वाढवली जाणार आहे. विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबर २०२५ सकाळी ६ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी ७ सप्टेंबर २०२५ रात्री ११ वाजेपर्यंत ४१ तास अखंड मेट्रो सेवा सुरु राहणार आहे.

गणेश चतुर्थीपासून ते पुढचे दोन दिवस म्हणजे २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सुरु राहील. तर ३०/०८/२०२५ ते ०५/०९/२०२५ या काळात मेट्रो नियमित वेळापत्रकानुसार रात्री उशिरापर्यंत धावेल.

पुणे मेट्रो वेळापत्रक

२७/०८/२०२५ ते २९/०८/२०२५ → सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सेवा

३०/०८/२०२५ ते ०५/०९/२०२५ → सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत सेवा

अनंत चतुर्दशी – ०६/०९/२०२५ → सकाळी ६ पासून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत, एकूण ४१ तास अखंड सेवा

त्यानंतर ०८/०९/२०२५ पासून मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Boss फेम अन् टिव्ही अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लालभडक लेहेंग्यातील Photo व्हायरल

Maharashtra Politics: भाजपचे मनसुबे हाणून पाडा, उद्धव ठाकरेंच्या कामगारसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना|VIDEO

Maharashtra Live News Update: तुरीच्या शेतात गांजाची लागवड

धक्कादायक! पीएम किसान सन्मान योजनेतून 2588 शेतकरी वगळले; तुमचं नाव यादीत आहे का? VIDEO

Vastu Tips : श्रीमंतांच्या घरी 'या' वस्तूंनी होते भरभराट; जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

SCROLL FOR NEXT