पुणे मेट्रोचा विस्तार विमानतळ तसेच कोंढवा-येवलेवाडी/उंड्री परिसरापर्यंत होणार आहे.
महा-मेट्रोने प्रकल्प अहवालासाठी निविदा मागवल्या आणि कामाला सुरुवात केली आहे.
नवीन मेट्रो मार्गिकेमुळे पुणेकरांना प्रवास सोपा आणि वेगवान होणार आहे.
Pune Metro News : पुण्यातील मेट्रो नेटवर्क एका नव्या अपडेटसाठी सज्ज झाले आहे. पुणे मेट्रो लोहेगाव येथील पुणे विमानतळ आणि वेगाने विकसित होत असलेल्या कोंढवा-येवलेवाडी/ उंड्री परिसराला नवीन मेट्रो कॉरिडोरने जोडण्याची योजना आखत आहे. या विस्तारासाठी महा-मेट्रो प्रशासनाने कामाला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे मेट्रोचा विस्तार लोहेगाव, कोंढवा-येवलेवाडी/ उंड्री या परिसरापर्यंत करण्यासाठी महा-मेट्रोने तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पहिल्या फेरीनंतर, आरवी इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स लिमिटेड आणि आरआयटीईएस लिमिटेड या दोन कंपन्यांनी तांत्रिक टप्प्याला मंजुरी दिली आहे.
येत्या काही दिवसांत प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडल्या जातील आणि सर्वात कमी रक्कम भरणाऱ्या कंपनीला डीपीआर तयार करण्याचे काम मिळेल.मेट्रो विस्ताराचा प्रकल्प अहवाल नवीन मार्गिकेचा अचूक मार्ग आणि व्यवहार्यता निश्चित करेल असे म्हटले जात आहे. सध्या शेअर करण्यात आलेले नकाशे हे कच्च्या स्वरूपातील आहेत. सविस्तर अभ्यासानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
नियोजनानुसार जर प्रकल्पाचे काम झाले, तर रहिवाशांना पुणे विमानतळापर्यंत सहज प्रवास करता येईल. याशिवाय कोंढवा-येवलेवाडीच्या वाढत्या निवासी भागामध्ये मेट्रोमुळे लोकांना प्रवास करणे सोईस्कर होईल. यादरम्यान पुणे मेट्रो ड्रायव्हरलेस ट्रेन सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. खडकवासला ते खराडी या प्रस्तावित मार्गाने याची सुरुवात होईल.
महा मेट्रोचे सिस्टीम अँड ऑपरेशन्स ऑफिसर विनोद अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो लाईन-४ च्या मंजूर तपशीलवार प्रकल्प अहवालाप्रमाणे, मेट्रो लाईन्स अटेंडेड ट्रेन ऑपरेशन (एटीओ) मोडमध्ये चालवल्या जाणार आहेत. यामध्ये ट्रेन ऑपरेटर प्रत्येक ट्रेनमध्ये उपस्थित राहून एटीओ-आधारित कम्युनिकेशन-आधारित ट्रेन कंट्रोलच्या (सीबीटीसी) कामकाजाचे पर्यवेक्षण करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.