Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro : केंद्रीय मंत्र्यांनी सूचवले पुणे मेट्रोचे नवे मार्ग, वाहतूक कोंडी फूटणार, कोण कोणत्या भागात जाळं होणार?

Pune Metro Expansion News : पुणे मेट्रोसाठी आणखी चार मार्ग केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सूचवले आहेत. या मार्गामुळे वाहतूक कोंडी फुटेल, असे म्हटले जातेय. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Pune Metro New Routes : मुंबईनंतर पुणे मेट्रोचा विस्तार वेगाने होत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोचं जाळं महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्यात मेट्रोच्या अनेक मार्गाचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रोसाठी काही नवे मार्ग सुचलवले आहेत. यामुळे पुणे आणि पिंपरची चिंचवड आणखी जवळ येईल. त्याशिवाय पुणे विमानतळावरला जोडणारी मेट्रोचा पर्याय सूचवलाय.

पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रो जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी असावी आणि पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करुन वाहतूक नियोजनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे सूचित केले आहेत. या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डिकर यांच्याशी झाली. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

१) खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका

पुणे महानगरपालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मंजूर मेट्रो मार्गात समाविष्ट करुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ-खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा.

२) खराडी येथे Interchangeable and Multimodal Transport Hub म्हणून विकसित करावे.

खराडी आणि परिसर हा व्यावसायिक आणि राहीवाशीदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असून Interchangeable and Multimodal Transport Hub साठी खराडी योग्य पर्याय आहे. खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमातळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरुन जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणारांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल. तर निगडी ते स्वागरेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल. शिवाय या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर-खराडी-विमानतळ हाही पर्याय उपलब्ध असेल. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगरहून खराडी येथे आणि तेथून थेट विमानतळावर जाता येईल. शिवाय खडवासला-स्वारगेट-हडपसर या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे खराडी हब होणे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे.

३) कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा !

पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून यात कात्रज- चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे सूचित केले आहे. या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करुन हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील.

४)भूसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपूलाची निर्मिती

वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरुपात करावा, जेणेकरुन या भागातील सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाचा प्रयोग यशस्वी झाला असून वनाज ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल आवश्यक आहे. त्यामुळे वनाज ते चांदणी चौक या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.

‘पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन भविष्याचा विचार करुन करणे गरजेचे आहे. मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुणे शहरात मेट्रोचे जाळे अधिक प्रमाणात विस्तारत आहे. मेट्रोच्या या विस्ताराचा अधिकाधिक पुणेकरांना फायदा व्हावा आणि शहरातील सर्व महत्त्वाचे भाग मेट्रो जोडले जावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.’
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरीक हवाई वाहतूक राज्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT