मावळमध्ये नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू
दुर्घटना पवना आणि इंद्रायणी नदीतील खोल डोहांमध्ये घडल्या
तिन्ही घटना वेगवगळ्या भागातील आहेत
मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला
दिलीप कांबळे, मावळ
Pune Maval 3 Boys Drowned In River पुण्यातील मावळ येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी नदीत पोहण्याचा आनंद लुटायला गेलेल्या ३ तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या तिन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून पोहायला जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली दुर्घटना शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेबडओहळ परिसरात पवना नदीत घडली. तर दुसरी घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत तुकाराम महाराजांच्या देहू (Tukaram Maharaj Dehu ) येथील गाथा मंदिराजवळील (Dehu Gatha Temple) चार पूल परिसरातील इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) डोहात घडली. तिसरी दुर्घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीपात्रात घडली. या तिन्ही घटनांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये निखिल कुशबा कानडे (वय २१, रा. भोसरी) आणि अरमान कुंभार (वय २१, मूळ रा. झारखंड) यांचा समावेश आहे. देहू येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीत (Dehu Gatha Tempele Indrayani River ) बुडालेल्या तिसऱ्या युवकाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नदी, धरण आणि डोह परिसरात पोहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र अनेकांना पाण्याची खोली, नदीतील प्रवाहाचा वेग आणि डोहांची धोकादायक रचना याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे क्षणिक आनंदासाठी केलेले धाडस जीवघेणे ठरत असल्याचे या घटनांमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग रेस्क्यू टीम तसेच स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येते. नदी, धरण परिसर आणि खोल डोहांमध्ये पोहण्याचे धाडस करू नये, असे वारंवार सांगितले जात असतानाही अनेक जण या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. या तीन मृत्यूंमुळे मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.