Crime news SAAM TV
मुंबई/पुणे

पुण्यातील धक्कादायक प्रकार; तरुणाचा खून केला, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुचाकीसह पेटवला

Pune rural crime news : मावळच्या पवनानगरमध्ये तरुणाचा खून करून मृतदेह दुचाकीसह जाळण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

पुण्यातील मावळच्या पवनानगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल अनंता मोहोळ (वय ३३, रा. वारू) या तरुणाचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह दुचाकीसह जाळण्यात आला. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन ते चार तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भरत काशिनाथ वाल्हेकर आणि सुनील भिमा पवार (दोघेही रा. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या भीषण घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. लोणावळा ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, संशयितांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. अत्यंत कौशल्याने तपास करत पोलिसांनी काही तासांतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात हा खून वैयक्तिक वादातून झाला असल्याचे समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अवघ्या काही तासांत आरोपींना जेरबंद केल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

चहाची टपरीवाला,भाजी विक्रेत्यालाही GSTची नोंदणी करावी लागते? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: पुण्याचा पाचवा मानाचा गणपती, केसरी वाड्यातील गणपतीचं 6 वाजता विसर्जन

घरात आढळणारी पाल खरंच विषारी असते का? चावा घेतल्यास काय करावं?

SCROLL FOR NEXT