Maval Indrayani Bridge Collapses  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Maval Indrayani Bridge Collapses : ८ कोटींचा पूल, ८० हजारच मंजूर? मावळमधील इंद्रायणी पूल कोसळला, राज ठाकरेंचा संताप

Maval Indrayani Bridge Collapses : इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. मात्र ही मागणी कुणी केलीय? सरकारकडून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कशी धुळफेक केली जातेय? आणि राज ठाकरेंनी कशा प्रश्नांच्या फैरी झाडल्यात?

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

पुणे : हा कोसळलेला पूल बिहारमधील नाही. तर हा पूल पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरचा आहे. हा पूल कोसळल्याने ४ पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर ५१ जणांचा जगण्यासाठी संघर्ष सुरुय. मात्र, याच पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला आणि त्याची पोलखोलच खासदार संजय राऊतांनी केलीय. तर राज ठाकरेंनीही इंद्रायणी पूल दुर्घटनेवरुन प्रश्नांची सरबत्ती करत सरकारला धारेवर धरलंय.

इंद्रायणी पूल कोसळला, राज ठाकरेंचा संताप

पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का केली नाही?

पूल धोकादायक असताना नव्याने पूल का बांधला नाही?

प्रत्येक घटनेनंतर सरकारची एकच ठराविक प्रतिक्रिया

सरकारचे इतके विभाग नक्की काय करतात?

तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पुलासाठी १५ कोटींची आवश्यकता असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ८० हजार रुपयांचीच मंजूरी दिली. त्यामुळे प्रशासनावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीच राऊतांनी केलीय.

राज्यातील २० हजार पेक्षा जास्त पुलांपैकी ४० टक्के पूल धोकादायक स्थितीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांनी दिलीय. त्यामुळे मुद्दा फक्त इंद्रायणी पूलाचा नाही तर सर्वसामान्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचं ऑडिट करायला हवं. याबरोबरच इंद्रायणी पूल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन निधी अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT