Pune Indrayani River Bridge Collapsed  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Maval News : खाली तुफान वाहणारी इंद्रायणी, सेल्फी अन् फोटो घेताना पूल कोसळला; कारण काय? वाहून गेलेल्या २५ जणांसोबत काय घडलं?

Pune Indrayani River Bridge Collapsed : रविवार असल्यामुळे शाळा, खासगी आणि शासकीय कार्यालये यांना सुट्टी असल्यामुळे कुंडमाळा या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक जात होते.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील एक लोखंडी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत २० ते २५ पर्यटक वाहून गेले आहेत. दुर्दैवाने या दुर्घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले आहेत. आता ही दुर्घटना नेमकी का झाली? आणि कशी झाली? असं प्रश्न आता विचारला जात आहे.

रविवार असल्यामुळे शाळा, खासगी आणि शासकीय कार्यालये यांना सुट्टी असल्यामुळे कुंडमाळा या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक जात होते. या ठिकाणाला भेट देण्याआधी इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडावा लागतो. या पुलावर मोठा पूल बसवण्यात आलेला होता. मात्र, अचानकपणे हा पूल कोसळला आणि पुलावरून जाणारे २० ते २५ पर्यटक थेट धो-धो वाहणाऱ्या नदीत वाहून गेले.

हा पूल बराच जुना आहे. असं असताना पुलावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून एकूण ५० पर्यटक जात होते. त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने हा पूल क्षणात तुटला आणि त्यावरून जाणारे पर्यटक थेट नदीत कोसळले. तसेच हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता. असं असताना त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त होती. त्यात भर म्हणून या पुलावरून जड असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या. हा पूल हवेतही हालत होता, असं सांगितलं जात आहे. या सर्व गोष्टींमुळे हा पूल अचानकपणे कोसळला आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे. वाहून गेलेले सर्व प्रवासी सुखरुप असावेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT