Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : मावळ हादरलं, अनैतिक संबंधातून २२ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

Pune Maval Crime News : पुण्यातील मावळच्या कान्हे आंबेवाडी येथील खळबळजनक घटना समोर आली आहे. २२ वर्षीय तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Namdeo Kumbhar

दिलीप कांबळे

Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पुण्यातील मावळ येथे अनैतिक संबंधातून २२ वर्षीय तरूणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मावळ येथील कान्हे आंबेवाडी येथील २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. कोयत्याने त्याच्या मानेवर सपासप वार करत जीव घेण्यात आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून मावळच्या कान्हे आंबेवाडी येथील २२ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला.. आरोपीने धारदार कोयत्याने युवकाच्या मानेवर वार करत जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले. मृत तरुणाचे नाव वैभव उमेश सातकर असे आहे. तर खून करणाऱ्या आरोपीचे नाव अंकुश जयवंत सातकर (वय बेचाळीस आंबेवाडी, कान्हे ) असे आहे.

वडगाव पोलीस ठाण्याला माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे पाठवला आहे. मयत वैभव सातकर आणि आरोपी अंकुश सातकर हे दोघे शेजारी राहत होते. मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी अंकुश सातकरने त्याच्यावर बैलाच्या गोठ्यात धारदार कोयत्याने वार केले.

या हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण मावळ परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT