PUNE FIRING CASE: GUNSHOTS AT H VIKAS STEEL OFFICE, LAWRENCE BISHNOI GANG LINK CLAIMED  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : "...तर पुढच्यावेळी डोक्यात गोळ्या घालू" लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्यवसायिकाच्या ऑफिसवर गोळीबार

Pune Firing News : पुण्यात व्यवसायिकाच्या ऑफिसवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा.

Alisha Khedekar

  • पुण्यात व्यावसायिकाच्या ऑफिसवर गोळीबार

  • बिश्नोई गॅंग कडून फायरिंग

  • आमचे कॉल इग्नोर करतो म्हणून बिश्नोई गॅंग कडून गोळीबार

  • लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जबाबदारीचा दावा, पोस्ट व्हायरल

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या ऑफिसवर गोळीबार झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या गोळीबारानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंतरवाडी परिसरात असलेल्या एच विकास स्टील (H Vikas Steel) या कंपनीच्या ऑफिसला लक्ष्य करत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऑफिसच्या परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये, "आम्ही अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला," असा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना पुढील काळात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशा स्वरूपाच्या धमक्याही पोस्टमध्ये देण्यात आल्या आहेत.

या पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोंकार आणि टायसन बिश्नोई या नावांचा उल्लेख असून त्यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या पोस्टची सत्यता आणि त्यामागे खरोखरच लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का, याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हा प्रकार खंडणी, व्यावसायिक वाद किंवा इतर कोणत्या कारणातून घडला याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुण्यातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुगाच्या डाळीपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, चव लागेल भारी

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

Shraddha Kapoor - Eetha : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाला विरोध; नाव बदलण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT