The horrifying moment captured on a local security camera shows the accused chasing and brutally assaulting the victim, Yuvraj Nighot, in broad daylight on a busy street in Manchar. saam tv
मुंबई/पुणे

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून भररस्त्यात मेव्हण्याला कारने उडवले, मग हॉकी स्टिक, लोखंडी पाइप अन् दांडक्यांनी बेदम मारहाण

Brutal attack on youth in Manchar over registered love marriage: मंचर शहरात बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेव्हण्यावर कारने धडक देत हॉकी स्टिक व लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, मंचर पोलिसांनी ४ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

मंचर /पुणे: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेव्हण्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने भररस्त्यात कारने मोटारसायकलला धडक देऊन त्यानंतर हॉकी स्टिक, लोखंडी पाइप व दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंचर शहरात घडली. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, मंचर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रणव अनिल सोनार, अनिल छबू सोनार (दोघे रा. मंचर), किरण बाळासाहेब कुलकर्णी व गणेश बाळासाहेब कुलकर्णी (दोघे रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज अशोक निघोट (वय २७, रा. मोरडेवाडी, ता. आंबेगाव) यांनी तेजस्विनी अनिल सोनार यांच्यासोबत ता. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे नोंदणीकृत प्रेमविवाह केला होता. हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. पाच महिन्यांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर तेजस्विनी यांनी युवराज यांच्या विरोधात मंचर पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केली होती. शनिवारी दुपारी युवराज निघोट हे मित्र साहिल संतोष धवसे याला घेऊन मोटारसायकलवरून मंचर बसस्थानकाकडून एमजीइ मोटर्स शोरूमकडे जात असताना, समोरून आलेल्या ब्रेझा कारने विरुद्ध दिशेला जाऊन त्यांच्या मोटारसायकलला मुद्दाम धडक दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

धडकेनंतर खाली पडलेल्या युवराज यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र आरोपींनी कारमधून उतरून पाठलाग करून हॉकी स्टिक, लोखंडी पाइप आणि दांडके घेऊन त्यांचा पाठलाग केला आणि गाठून बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या युवराज निघोट यांना स्वप्नील लोखंडे, गोरक्ष निघोट, आदिनाथ धवसे, ओंकार मिंडे आणि नारायण निघोट यांनी तातडीने मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर साहिल धवसे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

मंचर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT