pune man found dead in abandoned building x
मुंबई/पुणे

Pune : पुण्याच्या मुळशीतील व्यक्तीनं आयुष्य संपवलं, पडिक इमारतीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Pune News : पुणे-सातारा महामार्गाजवळ कापूरहोळ येथे एका रिकाम्या इमारतीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नायलॉनच्या दोरीने गळफास घेत या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे-सातारा महामार्गाजवळ असणाऱ्या कापूरहोळ येथील एका पडीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतहेद आढळून आला आहे. या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कापूरहोळ परिसरातील काहीजणांना तेथील पडीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. हा मृतदेह नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने इमारतीवर लटकत होता. मृतदेह दिसल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.

नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. संबंधित व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्यावरुन त्या व्यक्तीचे नाव आणि इतर माहिती मिळाली आहे. गणेश प्रकाश भोकरे (वय ४३) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती मुळशी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भोरच्या राजगड पोलीस स्टेशनकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

पुण्यात पुन्हा हाणामारी

कार पार्किंगच्या वादातून एका तरुणाला १० ते १२ जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. फिर्यादी तरुणाच्या तक्रारीनंतर मारहाण प्रकरणात पर्वती पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी तरुण आणि मारहाण करणारे एकाच इमारतीत राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये पार्किंगवरुन वाद होता. यावरुनच तरुणाला मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Clash : शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला,किंमत मोजावी लागेल; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर छावा संघटना आक्रमक

Ice Massage On Face: बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या

Baramati News: बारामतीत दुचाकी जळून खाक; परिसरात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: विजय घाडगे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार

Salher Fort : ट्रेकिंग प्रेमींनो! सह्याद्रीतील उंच शिखरावरचा शौर्याचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याला भेट दिलीत का?

SCROLL FOR NEXT