PUNE DRUG BUST: BANTA PILLS WORTH ₹3.38 LAKH SEIZED BY SHIVAJINAGAR POLICE Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : गस्त घालताना निर्जन स्थळी टेम्पो आढळला, चौकशी करताच... पुणे पोलिसांची मोठी कारवाई, काय सापडलं?

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत फुलचंद पानात वापरल्या जाणाऱ्या बंटा गोळ्यांचा लाखोंचा साठा जप्त केला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून, मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे.

Akshay Badve

  • शिवाजीनगर पोलिसांनी मोठी ड्रग्जविरोधी कारवाई केली

  • बंटा गोळ्यांचा लाखोंचा साठा जप्त

  • संशयास्पद टेम्पोमधून उघड झाला प्रकार

  • आरोपीला अटक; मोठ्या रॅकेटचा संशय

पुण्यात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत फुलचंद पानात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या बंटा गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात विष्णु रामरतन गुप्ता या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी नियमित गस्त घालत असताना त्यांना दिनदयाळ हॉस्पिटलजवळील एका निर्जन रस्त्यावर संशयास्पद स्थितीत उभा असलेला एक टेम्पो आढळून आला. हा टेम्पो बराच वेळापासून बेवारस अवस्थेत उभा असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

टेम्पोच्या मागील दरवाजाची कडी उघडून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या बेकायदेशीर व प्रतिबंधित बंटा गोळ्यांच्या पाकिटांचा साठा आढळून आला. या गोळ्या फुलचंद पानात नशेसाठी वापरल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी अटक केली.

आरोपी विष्णु रामरतन गुप्ता याच्याकडून एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा अमली पदार्थाचा साठा शहरात कसा आणि कोणासाठी आणला जात होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुण्यात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध

Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

Maharashtra News Live Update : नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

Tendli Bhat Recipe: महाराष्ट्रीयन पद्धतीचा तोंडली भात कसा बनवायचा?

Watermelon Side Effects: कलिंगड खाल्ल्यानंतर हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, थेट हॉस्पीटलमध्ये भरती व्हाल

SCROLL FOR NEXT