PUNE KHARADI LPG CYLINDER EXPLOSION: ONE DEAD, THREE SERIOUSLY INJURED IN MASSIVE FIRE Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील भयंकर घटना! सिलिंडर बदलताना अचानक ब्लास्ट, एकाचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Pune Cylinder Blast News : पुण्यातील खराडी येथील खांदवे नगरमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • पुण्यातील खराडी येथील खांदवे नगरमध्ये एलपीजी सिलेंडरचा भीषण स्फोट

  • स्फोटानंतर लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी

  • अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले

  • आगीत दोन फ्लॅटचे मोठे नुकसान झाले

  • पोलीस पुढील तपास करत आहेत

सचिन जाधव, पुणे

Pune Kharadi Gas Cylinder Blast Fire पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरातील खांदवे नगर येथे शुक्रवारी सकाळी घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे भीषण आग लागून एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास खांदवे नगरमधील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अचानक स्फोटाचा आवाज झाला. घरातील एलपीजी सिलिंडर (LPG Cylinde Blast) संपल्यानंतर नवीन सिलिंडर जोडताना गॅस गळती झाल्याने साचलेल्या गॅसचा मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर घराला आग लागली. स्फोट इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची खराडी, धानोरी आणि येरवडा केंद्रातील तीन वाहने तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. जवानांनी होज रिलच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्याचबरोबर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेत विष्णू गीते (वय 60), रुंदीवनिका विष्णू गीते (वय 50) आणि पांडुरंग विष्णू गीते (वय 35) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून एका जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

आगीमुळे इमारतीतील दोन फ्लॅटचे मोठे नुकसान झाले. एका फ्लॅटमधील हॉलसह फर्निचर, टीव्ही, वायरिंग तसेच घरगुती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. बाथरूमचे दरवाजे, गिझर यांनाही आग लागली. स्वयंपाकघरातील फ्रिज आणि फर्निचरपर्यंत या आगीची झळ पोहोचली. संपूर्ण घर धुरामुळे काळवंडून गेले होते. घटनेचे नेमके कारण आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी खराडी पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात सिलेंडर गळतीमुळेच हा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT