लोणी काळभोर Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: भयंकर! मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा, वॉट्सअपवर पाठवला व्हिडिओ; पुण्यातील खळबळजनक प्रकार

Pune Loni Kalbhor News: आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा अंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १७ डिसेंबर २०२३

Pune Black Magic News:

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुसंस्कृत, पुरोगामी पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रतिस्पर्धी मित्राचा मृत्यू होण्याकरता स्मशान भूमीमध्ये जाऊन अघोरी पूजा करून,पूजेचा व्हिडिओ मित्राला पाठवल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. या प्रकरणी गणेश तात्यासाहेब चौधरी ( रा. सो, ता.हवेली. जि. पुणे) याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणी काळभोर (Loni Kalbhor) हद्दीत गणेश चौधरी व त्याचा मित्र अमोल मानमोडे हे दोघे मिळून सोरतापवाडी येथे प्लॉटिंग व्यावसाय करत होते. मात्र मागील एक वर्षापासून व्यवसायावरुन दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून गणेश चौधरी याने मित्राचा मृत्यू व्हावा, त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा.. म्हणून मांत्रिकाच्या साहाय्याने अघोरी पुजा घातली.

धक्कादायक बाब म्हणजे या प्लॉटिंग व्यवसायिक मित्रांचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये आरोपी गणेश चौधरी याने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सोरतापवाडी स्मशानभूमीमध्ये चितेला अग्नी देण्याच्या ठिकाणी लिंबू कापून त्यामध्ये हळद कुंकू व इतर पूजेचे साहित्य मिसळून केलेल्या अघोरी पूजेचा हा व्हिडिओ ग्रुपमध्ये टाकला.

याबाबतची माहिती मिळताच चौधरी याच्या विरोधात मानमोडे यांनी लोणी काळभोर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध कायदा अंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Sanchar Saathi App: संचार साथी अ‍ॅप अनिवार्य नाही, प्री इन्स्टॉलचा केंद्र सरकारचा निर्णय मागे

Health Care : हिवाळ्यात रक्त वाढवण्यासाठी खावेत हे पदार्थ

Sambhajinagar : नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

SCROLL FOR NEXT