Manoj Jarange Patil: 'कशी चर्चा करायची तुमच्याशी', महाजनांना ती गोष्ट आठवण करून देत जरांगे पाटीलांनी व्यक्त केली नाराजी

Antarwali Sarathi Lathicharge: अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ, असं तुम्ही सांगितलं आणि तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत, असं म्हणत जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
Manoj Jarange Patil on Antarwali Sarathi Lathicharge
Manoj Jarange Patil on Antarwali Sarathi LathichargeSaam Tv
Published On

Girish Mahajan Meet Manoj Jarange Patil in Hospital:

अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ, असं तुम्ही सांगितलं आणि तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत. असं असताना कशी चर्चा कार्याची तुमच्याशी?, असं म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातच आज संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांची मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा केली. त्यावेळी जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil on Antarwali Sarathi Lathicharge
Uddhav Thackeray Speech: अदानी, मोदी, वर्ल्डकप; धारावीतून उद्धव ठाकरेंची फटकेबाजी, जाणून घ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''अंतरवाली सराटीबद्दल आम्ही बोललो होतो, ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, ते 132 हून अधिक आहेत. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. मग आम्ही सांगत आहोत त्यांच्यावरही तुम्ही गुन्हे दाखल करायला हवे. त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी तुम्ही (राज्य सरकार) म्हणालात द्या विषय सोडून तो आता.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ. आता तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत. आम्ही काय चूक केली, तुमचा शब्द आम्ही मोडला नाही, मात्र आमचा एक-एक माणसाला तुम्ही अटक करत आहेत. कितीतरी लोकांना नोटीसही गेली आहे. असं असताना कशी चर्चा कार्याची तुमच्याशी?''

Manoj Jarange Patil on Antarwali Sarathi Lathicharge
Dharavi Morcha News: 'अदानींसाठी पालिकेत पालकमंत्र्यांचं ऑफिस?', धारावी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याचदरम्यान सरकारच्या दोन मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आहे. यातच उद्या म्हणजे रविवारी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची मराठा नेत्यांची बैठकही होणार आहे. या बैठकीत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर आंदोलन कसं पुढे घेऊन जावं, यावर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com