Dharavi Morcha News: 'अदानींसाठी पालिकेत पालकमंत्र्यांचं ऑफिस?', धारावी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Uddhav Thackeray News: ''मुंबईचा विकास दिल्लीतून होणार का? तसेच अदानींसाठी पालिकेत पालकमंत्र्यांचं ऑफिस देणारा का'', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी ग्रुपला आलं असून याच विरोधात ठाकरे गटाने आज विशाल मोर्चाचं आयोजन केलं आहे.
Uddhav Thackeray On Dharavi Redevelopment Adani Group
Uddhav Thackeray On Dharavi Redevelopment Adani GroupSaam Tv
Published On

>> विनय म्हात्रे

Uddhav Thackeray On Dharavi Redevelopment Adani Group:

''मुंबईचा विकास दिल्लीतून होणार का? तसेच अदानींसाठी पालिकेत पालकमंत्र्यांचं ऑफिस देणारा का'', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी ग्रुपला आलं असून याच विरोधात ठाकरे गटाने आज विशाल मोर्चाचं आयोजन केलं आहे. यातच उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''हा लढा फक्त मुंबईसाठी नाही, राज्यासाठी आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर बसणार आहे. गदारांना खोके कोणी पोहचवले असतील हे आता तुम्हाला समजलं असेल. धारविकारांच्या गळा घोटणार जीआर काढला का?''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray On Dharavi Redevelopment Adani Group
Dharavi Morcha: स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा धारावी बद्दल का काही केलं नाही? शिंदे गटाच्या खासदारांचा ठाकरेंना सवाल

ते म्हणाले, ''धारावीसोबत देवनार ही अदानींला देणार आहेत. सर्व अदानींला देणार आहेत. धारावीत बूट ही बनतात, पापड ही बनवतात. वेळ आली तर, पापडासारखं लाटून टाका. कोरोना काळात यांनी फक्त थाळी वाजवली, आम्ही मात्र धारावीला वाचवलं. अपात्र लोकांना मिठागरात टाकणार म्हणजे मिठागराची जागा ही अदानी यांना देण्याचा डाव आहे. हे सर्व देऊन धारविकारांना काय देताय? आता त्यांना 500 फुटाचा घर मिळालं पाहिजे.'' (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''धारावीत सर्व वस्तू बनतात. धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे. सर्व चोरलं, पण माझ्यावरील जनतेचा विश्वास नाही चोरू शकणार. भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणूक घेत नाही, यांना चिंता आहे. पण आमचं सरकार येणार.''

Uddhav Thackeray On Dharavi Redevelopment Adani Group
Ethanol Production: ..म्हणून केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

ते म्हणाले, ''मुंबईतले कोळीवाडे, कुंभारवाडे घशात घालणं, इतकं सोपं नाही. धारावीकरांच्या केसाला धक्काही लागू देणार नाही. सरकार येतं, जातं,पण पोलिसांनी आपलं रेकॉर्ड खराब करू नका. निवृत्त पोलिसांनी गुंडगिरी सोडलेली आहे. मी प्रकल्पाच्या विरोधात नाही. यांना चावी दिल्याशिवाय घर दिलं जाणार नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''विकास करायचा असेल तर पोलिसांना, गिरणी कामगारांना, सफाई कामगारांना घर द्या. वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातमध्ये नेली. त्यांना भारत जिंकेल किंवा हारेल याची चिंता नव्हती. पैसे पाहीजे होते.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com