ACB BOOKS PUNE REVENUE OFFICER FOR ALLEGEDLY DEMANDING RS 1 LAKH BRIBE IN LAND PERMISSION CASE Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Bribe Case : महसूल विभागात खळबळ! पुण्यात बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Pune ACB Bribe Caught Red Handed : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारीविरुद्ध एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • ग्राम महसूल अधिकारी अक्षय कोल्हे यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल

  • जमीनसंबंधीच्या परवानगीसाठी एक लाख रुपयांची लाच मागितली

  • तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर प्राथमिक चौकशीत आरोपांची पडताळणी

  • लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

सचिन जाधव, पुणे

Pune Loni Kalbhor Akshay Kolhe Taking Bribe पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालयातील एका ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची बातमी समोर आली आहे. जमीनसंबंधीच्या कामासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. अक्षय शिवाजी कोल्हे (Akshay Kolhe) असे गुन्हा दाखल झालेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी हवेली तालुक्यातील हिंगणगाव (Haweli Taluka Hingangao) परिसरातील शेतजमिनीच्या सपाटीकरणासह विहीर खोदकाम आणि पाईपलाईन टाकण्याच्या परवानगीसाठी अप्पर तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्याने त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, सुरुवातीला आरोपी अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, वाटाघाटी करून एक लाख रुपये मागितले गेल्याचे एसीबीच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. अधिकाऱ्याने ही रक्कम काम मंजूर करून देण्यासाठी मागितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. याबाबत तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची सत्यता जाणून घेण्यासाठी एसीबीने चौकशी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सरकारी कार्यालयांमध्ये लाचखोरीच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातही खळबळ उडाली असून एसीबीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

SCROLL FOR NEXT