Pune Lonavala Lions Point Accident News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात आक्रीत घडलं, टायगर पॉईंटवरून २५० फूट खोल दरीत कोसळून नौदलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Pune Maval Lonavala Accident Tragedy : लोणावळ्यातील प्रसिद्ध लायन्स पॉईंट येथे भारतीय नौदलाचे कर्मचारी राकेश कुमार मिश्रा यांचा २५० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला. घटनेचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्याचा दरीत पडून मृत्यू

  • राकेश कुमार मिश्रा हे सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळले

  • बचाव पथकांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला

  • पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

दिलीप कांबळे, मावळ

Pune Lonavala Famous Lions Point Accident News लोणावळा येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लायन्स पॉईंट परिसरात आज एक दुर्दैवी घटना घडली. भारतीय नौदलाच्या INS शिवाजी येथे कार्यरत असलेले कर्मचारी राकेश कुमार मिश्रा (वय ५०) यांचा सुमारे २५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश मिश्रा (Rakesh Mishra) हे आज लायन्स पॉईंट परिसरात गेले होते. दरम्यान, अचानक तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले. परिसरातील नागरिकांनी आणि पर्यटकांनी तत्काळ याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळताच INS (Indian Naval Ship) शिवाजीचे पथक, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, मावळ आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

बचाव पथकांनी अत्यंत धाडसाने आणि शिताफीने दोरांच्या सहाय्याने २५० फूट खोल दरीत उतरून शोधमोहीम सुरू ठेवली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर राकेश मिश्रा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघाती मृत्यू असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

दरम्यान, लायन्स पॉईंट हे लोणावळ्यातील (Pune Lonavala Famous Lions Point) अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र अनेकदा पर्यटक सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत धोकादायक ठिकाणी फोटो काढण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जातात. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळांवर खबरदारी घेणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी 'दारूकांड' तपास सी आय डी करण्याची शक्यता

Health Care: स्ट्रॉन्ग हेल्थसाठी आलिया भट्टचा हा सुपरफूड नक्की खा; वाढेल दुप्पट एनर्जी

Sunday Mega Block : रेल्वे प्रवाशांनो, गरज असेल तरच लोकल प्रवास करा, मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कुठे आणि कधी?

मोठी बातमी! 42 दिवसांनंतर भोंदू बाबाला जमीन मंजूर

Chanakya Niti : तुमच्यालाही लोक ४ माणसात मुर्ख ठरवतायेत? चाणक्यांच्या सल्ल्यानुसार आत्ताच बदला या सवयी

SCROLL FOR NEXT