Shruti Vilas Kadam
एक उत्तम दर्जाचे ज्यावर अनेक मोबाईल चार्ज करता येतील असेच डिव्हाईस खरेदी करा. मोबाईल आणि इतर USB चार्ज करण्यासाठी पॉवर बँक वेळीच चार्ज करून ठेवा.
वीज गेल्यानंतर रिचार्जएबल एलीडी लाईट हा एक उत्तम पर्याय आहे. वीज गेल्यानंतर रिचार्ज एलीडी लाईट साधारण ३ ते ४ तास प्रकाश देते . शिवाय बाजारात विविध प्रकारचे पोर्टएबल एलीडी लाईट उपलब्ध आहेत.
लॅपटॉप, Wi-Fi राऊटर, किंवा एखादे छोटे उपकरणाला चार्ज करण्यासाठी पोर्टएबल पॉवर स्टेशन खूप उपयोगाचे आहे. पोर्टएबल असल्याने कुठेही सहज नेता येते.
वायफाय राउटरला वीज पुरवण्यासाठी मिनी यूपीएस हे एक छोटे उपकरण वापरू शकता. जे वीज गेल्यानंतरही ते सलग २ ते ४ तास इंटरनेट चालू ठेवते.
सौर कंदील म्हणजे सौरऊर्जेवर चालणारा एक पोर्टेबल दिवा आहे. ग्रामीण भागात किंवा वीज गेल्यावर हा प्रकाश मिळवण्याचे एक अत्यंत सोपे आणि पर्यावरणपूरक साधन आहे.
गरमीच्या वेळी वीज गेल्यावर रिचार्जेबल फॅनची हवा उपयोगी ठरते. हा फॅन सलग 4 ते १२ तास हवा देऊ शकतो. लहान बाळांसाठी हा फॅन अत्यंत उपयोगी ठरतो.
इन्व्हर्टर बल्ब रिचार्जेबल एलईडी बल्ब आहे, जो वीज गेल्यानंतर आपोआप चालू होतो आणि 3 ते 5 तासांपर्यंत प्रकाश देतो. यातील बॅटरी जी सामान्य वीज सुरू असताना चार्ज होते.
चाव्यांच्या जुडीला अडकवता येणारी आणि आपत्कालीन वेळी कामाला येईल अशी ही एलईडी लाईट एवढी छोटी असते, त्यामुळे कुठेही सहज नेता येते.
वीज जाण्याआधीच डिव्हाईस चार्ज व्यवस्थित चार्ज करून ठेवा. ज्यामुळे लाईट गेल्यावरही मोबाईल आणि इतर डिव्हाईस सहज वापरता येतात.