Pune Bogas Voting Saam TV
मुंबई/पुणे

Pune Bogas Voting : माझ्या नावावर कुणीतरी बोगस मतदान केलं; पुण्यातील तरुणी भडकली, VIDEO केला शेअर

Pune Bogas Voting News: पुण्यात सर्वाधिक बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या नागरिकांच्या नावावर आधीच कुणीतरी मतदान केल्याचं समोर आलं आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. तर काही ठिकाणी बोगस मतदानाच्या घटना देखील घडल्या आहेत. पुण्यात सर्वाधिक बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या नागरिकांच्या नावावर आधीच कुणीतरी मतदान केल्याचं समोर आलं आहे.

यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोथरुड परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर एक तरुणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेली होती. ही तरुणी पहिल्यांदाच लोकशाहीचा हक्क बजावणार होती. मात्र, तिच्या नावावर आधीच दुसऱ्या व्यक्तीने मतदान केलं होतं. त्यामुळे तरुणीला मतदानापासून वंचित राहावं लागलं.

हा प्रकार समोर येताच तरुणी चांगलीच संतापली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिने व्हिडीओच्या माध्यमातून दिली. गौतमी पाटील असं या तरुणीचं नाव आहे. ती कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी गौतमी थोरात उद्यान येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेली होती.

मतदान केंद्रावर पोहचल्यावर मतदान कर्मचाऱ्यांनी तिला मतदान करण्यापासून रोखलं. गौतमीने जाब विचारला असता, तुझ्या नावावर आधीच मतदान झालं आहे, असं कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं. यामुळे गौतमीला चांगलाच धक्का बसला. आपल्याला कुणीही सहकार्य केलं नसल्याचा आरोप गौतमीने केला आहे.

दरम्यान, मतदान कर्मचाऱ्यांनी मला १७ नंबरचा फॉर्म भरून दुसरे मतदान करा, असं सांगितलं आहे. पण आता मी दुसरं मतदान करणार नाही, असंही गौतमीने सांगितलं आहे. आपल्या नावावर कुणीतरी दुसराच व्यक्ती मतदान करतो हे लोकशाहीसाठी घातक आहे, असंही गौतमीने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Fruits: नियमित ही ५ फळे खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

SCROLL FOR NEXT