Fiancé Ketan Agarwal seen in his final moments before being allegedly pushed off Lohagad Fort by his bride-to-be and her lover in a shocking Pune murder case. saam tv
मुंबई/पुणे

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

Shocking Pune Crime: पुण्यातून एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी गुन्हेगारीची घटना समोर आलीय...ज्या तरुणीसोबत आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्या...ज्या तरुणीला आपली अर्धांगिनी मानलं...त्याच होणाऱ्या बायकोने प्रियकराच्या मदतीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढलाय...काय आहे हे सगळं प्रकरण पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...

Sandeep Chavan

...पुणे जिल्हा हादरलाय याच केतन अग्रवालच्या हत्येनं...

केतनचा होणाऱ्या बायकोनेच गोड बोलून काटा काढलाय...कुणालाही संशय येऊ नये असा प्लान करून लोहगडावरून ४०० फूट खोल दरीत केतनला ढकलून दिलं आणि त्याची हत्या केली...हत्येचं कारण इतकंच होतं की सिया गोयलला केतनशी लग्न करायचं नव्हतं...तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं...हे केतनला माहित नव्हतं...लग्न ठरल्यानंतर केतन सियावर जीवापाड प्रेम करायचा...सियाही त्याच्यासोबत नेहमी असायची..

.पण, सियाने गोड बोलून प्रियकराच्या मदतीने त्याचा विश्वासघात केला...हीच आहे ती सिया गोयल...आणि तिचा प्रियकर आहे चेतन चौधरी...केतनच्या हत्येचे हेच दोघे मास्टरमाईंड...

केतनला आपल्या वाटेतून हटवायचं कसं याचा प्लान त्यांनी राजा रघुवशीच्या हत्येप्रमाणे केला...राजा रघुवंशीचीही त्याची सोनमने हत्या करून बनाव केला होता...आणि याच हत्येसारखं यांनी हा प्लान केला...

आणि इथूनच सुरू झाला केतनच्या मृत्यूचा प्रवास...हाच शेवटचा व्हिडिओ आहे, वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघे फिरायला निघाले...केतन खूप खूश दिसतोय...सियाही त्याच्यासोबत गप्पा मारतेय...याच गाडीने दोघेही लोहगडावर फिरायला गेले...तिथे इन्ट्री झाली ती प्रियकर चेतन चौधरीची...यांनी कसा हत्येचा कट रचला पाहुयात...

हत्येचा कसा रचला कट?

हत्येआधी 18 जूनला सिया आणि प्रियकराने लोहगडाची रेकी केली

सिया केतनला घेऊन किल्ल्याच्या एका उंच पॉइंटवर गेली

तिथे अचानक पाठीमागून आलेल्या चौधरीने केतनला धक्का दिला

केतन 400 फूट दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला

हत्या करून सियाने केतन लोहगडावरून पडल्याचा बनाव केला...पण, भर उन्हात हुडी घालून लोहगडावर फिरणाऱ्या या चेतनवर संशय आला आणि हत्येचा कट उघड झाला...सियाचं प्रेमप्रकरण गोयल कुटुंबीयांना माहिती असूनही लपवल्याचा आरोप केतनच्या कुटुंबीयांनी केलाय...या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चेतन चौधरी आणि सियाला ताब्यात घेतलंय...केतन आणि सियाचं लग्न होणार होतं...त्याची जोरदार तयारीही सुरू होती...

केतन-सियाच्या शाही लग्नाचं प्लॅनिंग

केतन-सिया नोव्हेंबरमध्ये बोहल्यावर चढणार होते

लग्नासाठी अग्रवाल कुटुंबाकडून जयपूरमध्ये पॅलेस बुक

जयपूरच्या पॅलेससाठी 17 कोटी रुपयांचा खर्च

लग्नात येणाऱ्यांसाठी 2 विशेष विमानांची सोय

मात्र, त्याआधीच या नात्याचा एन्ड झालाय...सियाच्या प्रेमप्रकरणात अग्रवाल कुटुंबाने त्यांचा मुलगा गमावलाय...

सियाच्या घरांच्याही यामध्ये सहभाग असल्याचा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केलाय...आता चौकशी होईल, कारवाई होईल...पण, यात बळी गेलाय तो सियावर जीवापाड प्रेम करणाऱ्या केतनचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर 'ऑपरेशन बीएमसी' खासदारांनंतर आता नगरसेवकही फुटणार?

Maharashtra News Live Update: पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! नागपूरात बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, पुण्यात नकली स्किनकेअरचा धक्कादायक प्रकार

शिंदेसेनेच्या नेत्याकडून बाळासाहेबांची खिल्ली, पावसकरांच्या लेखी शिवसेना पाळणाघर

सर्व बंडखोर खासदारांना उमेदवारीची हमी, शिंदेंकडून 2029च्या उमेदवारांची घोषणा

SCROLL FOR NEXT