KETAN AGRAWAL MURDER CASE: SIA'S SHOCKING CONFESSION REVEALS NEW TWIST IN PUNE LOHAGAD KILLING Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : लोहगडावरून ढकलून केतन अग्रवालची हत्या का केली? सियाने सांगितलं हादरवणारं कारण

Pune Lohagad Fort Ketan Agarwal case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सियाने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात केतनबद्दल वैयक्तिक नाराजी व्यक्त करत प्रियकर चेतनने हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा दावा केला आहे.

Alisha Khedekar

  • सियाने पोलिस चौकशीत केतनबद्दल वैयक्तिक नाराजी असल्याचे सांगितले

  • प्रियकर चेतनने हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा सियाचा दावा

  • लोहगड किल्ल्यावर केतनला ढकलून हत्या केली

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. केतनची होणारी बायको सियाने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली देताना धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सियाला केतनमधल्या दोन गोष्टी खटकतं होत्या. यामुळे तिने केतनशी लग्न करण्यासाठी नकार देत असल्याचं म्हटलं आहे. तसेच सियाचा बॉयफ्रेंड चेतनने तिला केतनची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी नवीन खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाला कोणतं नवीन वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नेमकं प्रकरण काय?

केतन अग्रवाल याचे सिया नावाच्या २० वर्षीय तरुणीसोबत लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबाचे जुने संबंध असून कुटुंबाच्या एकमताने हे लग्न ठरवण्यात आले होते. मात्र हे लग्न सियाला मान्य नव्हते. तिचे चेतन नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब सियाने केतनला सांगितल्याचं तिने म्हटलं. मात्र केतनचा या प्रेमसंबंधांना नकार होता. प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या केतनचा सियाने काटा काढायचं ठरवलं. ठरवल्याप्रमाणे तिने पहिला प्लॅन १८ जून रोजी आखला. १८ जूनला सिया केतनला पुण्यातील प्रसिद्ध लोहगडावर घेऊन गेली. मात्र तिथे तिचा प्लॅन फसला आणि तिने सापाचा भान करून धक्का लागल्याचे सांगितले. पहिला प्लॅन फसल्यासामुळे सिया आणि चेतनने एका कॅफेमध्ये बसून नवीन प्लॅन आखला. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी चेतनने देखील सियाला साथ दिली.

केतनचा मृत्यू कसा झाला?

सियाने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी केतनला लोहगडावर जाण्याचा हट्ट धरला आणि तिथे गेल्यावर केतनला ठरलेल्या प्लॅनप्रमाणे गडावरून खाली ढकलून दिल. या दुर्घटनेत केतनचा मृत्यू झाला. केतनच्या मृत्यूनंतर सियाने अपघाताचा बनाव रचला. केतनचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्या बहिणीला संशय आल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. तपासात सियाने केलेल्या खुनी कृत्याचा भांडाफोड झाला. याप्रकरणी सिया आणि चेतनला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सियाचा मोठा खुलासा

पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, सियाने केतनबद्दल वैयक्तिक नाराजी व्यक्त केली. "केतन तोतरे बोलत होता आणि डोक्यावर विग वापरत असल्याने तो मला आवडत नव्हता," असे तिने सांगितल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की , "केतनला केसांचा पॅच होता. ही बाब आम्ही सियाच्या कुटुंबाला आधीच सांगितली होती," असे स्पष्ट केले. दरम्यान सियाने चेतननेच केतनची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे देखील पोलीस चौकशीत म्हटले. सियाच्या या वक्तव्याने आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC अखेर दरवाढ केलीच! मध्यरात्रीपासून नवे दर लागू; किती असेल मुंबई-पुण्यासाठी तिकीट

खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला; न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला, ऑफिस कंटेनर हटवला

सलमान खानचा SRA मध्ये जलवा! झोपडपट्टीधारकांना मिळालं हक्काचं घर

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

Warkari Accident: वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात; सातारा-पुसेगाव रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT