प्राची कुलकर्णी -
पुणे: पुण्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आणि युवा सेना राज्य सहसचिव किरण साळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला (Shivsena) 'अखेरचा जय महाराष्ट्र' केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाळी केल्यापासून शिवसेनेतून गळती सुरु आहे. ठाणे, नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी शिवसेना सोडल्यानंतर आता पुण्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसलें यांनी देखील राजीनामा दिला आहे.
आपल्या राजीनाम्याबाबत भोसले यांनी पक्ष प्रमुख उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरेंना पत्र लिहंलय त्यांनी पत्रात म्हटलं आहे, 'शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच, पण, गेले अडीचवर्षे मविआमुळे आपल्या संघटनेची गळचेपी होत आहे त्याचा निषेध म्हणून शिवसेना पुणे सहसंपर्कप्रमुख या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात लिहंल आहे.
पाहा व्हिडीओ -
तर दुसरीकडे युवासेना राज्य सहसचिव किरण साळी यांनी आपला राजीनामा आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) पाठवला आहे. साळी आणि भोसलेंनी काल पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वागत केले होते. साळी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेबांच्या विचाराने सतरा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे शिवसेना गटप्रमुख ते युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य या पदांवर काम करत असताना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. युवक-युवतींच्या शिक्षण, आरोग्य व रोजगार या प्रश्नांवरती आक्रमक आंदोलने केली.
काही आंदेलनात तुरुंगातही जाण्याची वेळ आली पण कधीही डगमगलो नाही माघार घेतली नाही. ८०% समाजकारण व २०% राजकारण या शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेने काम केले. माझी निष्ठा शिवरायांच्या भगव्याशी, हिंदवी स्वराज्याशी प्रबोधनकारांच्या विचारांशी आणि वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी आहे. मी शिवसेनेचा आणि शिवसेना माझी आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिलेदारांना बळ देणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे मी आज युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.' असं त्यांनी पत्रामध्ये लिहलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.